1. सरकारी योजना

Goverment Scheme: केंद्र सरकारच्या 'या' योजनेचा लाभ घ्या आणि पती-पत्नी मिळून मिळवा दरवर्षी 72 हजार रुपये पेन्शन

आयुष्यामध्ये प्रत्येक जण काबाडकष्ट करून पै पै जमवतो आणि त्याचा उपयोग व्यवस्थितरीत्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मुलांची लग्न, त्यांची शिक्षण, दररोज आपला प्रपंच आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वृद्धापकाळ आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित राहावा यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी आपल्याला आपली बचत एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करणे फार गरजेचे असते जेणेकरून आपल्याला आपल्या गरजेच्या वेळी पैसा उपलब्ध व्हावा म्हणजे एकंदरीत एक सुरक्षित आणि चांगला परतावा मिळावा ही अपेक्षा असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
central goverment pention scheme

central goverment pention scheme

आयुष्यामध्ये प्रत्येक जण काबाडकष्ट करून पै पै जमवतो आणि त्याचा उपयोग व्यवस्थितरीत्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मुलांची लग्न, त्यांची शिक्षण, दररोज आपला प्रपंच आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वृद्धापकाळ आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित राहावा यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी आपल्याला आपली बचत एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करणे फार गरजेचे असते जेणेकरून  आपल्याला आपल्या गरजेच्या वेळी पैसा उपलब्ध व्हावा म्हणजे एकंदरीत एक सुरक्षित आणि चांगला परतावा मिळावा ही अपेक्षा असते.

यासाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे 'प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना' होय. ही योजना तुमचा वृद्धापकाळ आर्थिक दृष्ट्या समृद्ध जावा यासाठी तुम्हाला मदत करते. या लेखात आपण या योजनेविषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:सर्वात्तम परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या 'या' चार योजना आहेत सर्वोत्तम, वाचा सविस्तर तपशील

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

 या सरकारी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपयांची पेन्शन मिळणे शक्य आहे. यासाठी तुम्हाला प्रतिमहिना 55 रुपये गुंतवणुकीवर दरमहा तीन हजार रुपयाची पेन्शन सुरू होते.

ज्या व्यक्ती या योजनेचे सदस्य असतील त्यांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह तीन हजार रुपये पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. या हिशोबाने एखाद्या व्यक्तीला दरवर्षी छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

जर पती पत्नी मिळून दोघांनी  या योजनेत पात्र असाल व सहभाग नोंदवला असेल तर त्यांना दरवर्षी 72 हजार रुपये पेन्शन मिळते. समजा याच्या मध्ये जर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाला व त्याच्या लाभार्थी पैकी जोडीदाराला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून निम्मी पेन्शन मिळते.

कुणाला घेता येतो या योजनेचा लाभ?

 जे भारतीय नागरिक असंघटित क्षेत्रात काम करतात अशा कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून त्याचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असावे. परंतु जे लाभार्थी आयकर, एपीएफओ, एनपीएस आणि ईएसआयसीचे सदस्य आहेत, अशांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

नक्की वाचा:Post Office Scheme: गुंतवणूकदारांची होणार बल्ले-बल्ले..! पोस्टात फक्त 333 रुपये गुंतवा, अन मिळवा तब्बल 16 लाख

 यामध्ये पैसे जमा करण्याचे स्वरूप

 ज्यांचे वय 18 वर्षे आहे अशा व्यक्तींना अर्ज करायचा असेल तर वयाच्या साठ वर्षापर्यंत पंचावन्न रुपये दरमहा जमा करावे लागतील.

समजा एखाद्याचे वय 29 वर्षे असेल तर अशा व्यक्तीला या योजनेत पेन्शनचा लाभ घेण्यासाठी वयाच्या साठ वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला शंभर रुपये जमा करावे लागतील आणि

ज्या व्यक्तीचे वय 40 वर्षे असेल व अशा व्यक्तीला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांना प्रति महिन्याला 200 रुपये जमा करावे लागतील. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत तुम्ही जितके पैसे जमा कराल तितकेच सरकारद्वारे जमा केले जातात.

 नोंदणीसाठी

 जर तुम्हाला या योजनेत नाव नोंदणी करायचे असेल तर तुमच्याकडे आधार क्रमांक, मोबाईल फोन आणि एक बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी अर्थात कॉमन सर्विस सेंटरमध्ये अर्ज करू शकता.

नक्की वाचा:भारीच की ! 25 पैशांच्या नाण्यांच्या बदल्यात मिळतायेत 40 हजार; असा घ्या लाभ...

English Summary: this is useful goverment scheme for get pention to old age person Published on: 10 August 2022, 01:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters