आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करावे लागणार असून त्यासाठी एक ऑगस्ट पासून संपूर्ण देशभर आधार जोडणी चा शुभारंभ करण्यात येणार असून मतदानाची स्लिप ते मतदानाच्या संबंधित कुठलीही माहिती मतदाराला त्याच्या मोबाईलवर मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी दिली.
एक ऑगस्ट पासून देशभर जी मोहीम सुरू करण्यात येणार आहे त्यामध्ये मतदारांची ओळख प्रस्थापित करणे तसेच मतदार यादी यांचे प्रमाणीकरण, जे नावे डबल आलेले असतील, अशी नावे वगळणे इत्यादी या मोहिमेचा हेतू आहे.
तुम्ही आधार कार्ड सोबत मतदान कार्ड लिंक केले नाही म्हणून मतदानाचा अधिकार जाणार नाही किंवा यादीतून नाव वगळले जाणार नाही.
परंतु लिंक केल्यामुळे मतदारांना निवडणुकीसंदर्भातील यांच्याकडे सुविधा आहे त्या मिळणार आहेत. जसं की काही जणांना त्यांच्या आधार क्रमांकाची ओळख गुप्त ठेवायचे असते. त्यामुळे आधार क्रमांक नमूद केलेले प्रत्यक्ष आणि कम्प्युटराइज्ड कागदपत्रे दुहेरी कुलूपबंद ठेवले जाणार आहेत.
एवढेच नाही तर या माध्यमातून आधार क्रमांकाची गोपनीयता राखता यावी यासाठी आधार कार्डावरील क्रमांकाचे मास्किंग करण्यात येणार आहे म्हणजेच ते लपवण्यात येणार आहे.
यापासून मिळणारे फायदे
मतदार ओळखपत्र शी आधार कार्ड संलग्न केल्यामुळे मतदारांच्या ओळखीचे प्रमाणीकरण होणार आहे. तसेच एकापेक्षा अधिक नोंदी असतील तर त्या वगळल्या जाणार असून मतदाना संबंधी विद्यमान माहिती तसेच निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचना मतदाराला मोबाईलद्वारे अवगत होणार आहेत.
नक्की वाचा:बिग ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, भाजप आता राष्ट्रवादी फोडणार..
Share your comments