1. बातम्या

बिग ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, भाजप आता राष्ट्रवादी फोडणार..

शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसाकाठी वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीलाही गळती लागणार हे पहावे लागणार आहे. आता माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता शिंदे गटाने आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला आहे. शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसाकाठी वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीलाही गळती लागणार हे पहावे लागणार आहे.

आता माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे आता लवकरच ते पक्ष बदलणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा देखील सुरु आहे. आता भेट घेतल्यानंतर प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार का हे पहावे लागणार आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

राजन पाटील हे माजी आमदार तर बबनदादा शिंदे हे माढा मतदार संघाचे आमदार आहेत. आता त्यांच्या या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यानच्या काळातच महाराष्ट्र सदनामध्ये राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठीता सिलसिला सुरु झाला आहे. यामुळे चर्चा सुरु आहे.

फक्त १८ दिवसात तयार होणारे हे खत शेतकऱ्यांना देत आहे नवसंजीवनी, घरीच करा तयार...

तसेच जालन्याचे अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. असे असताना माढा विधानसभा मतदार संघाचे आ. बबनदादा शिंदे आणि माजी आ. राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे दोन राष्ट्रवादीचे नेते आता भाजपात प्रवेश करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे अनेक गणित अवलंबून आहेत.

महत्वाच्या बातम्या;
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, पदाची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाल्या द्रौपदी मुर्मू, जाणून घ्या..
राज्यात वाढणार नवीन सहकारी कारखाने? कारखान्यांना परवानगी देण्याची मागणी
सरकारचे हे कार्ड शेतकऱ्यांचे उत्पन्न करणार दुप्पट, शेतकऱ्यांनो जाणून घ्या सर्व माहिती

English Summary: Big Breaking! Big blow to NCP party, BJP will break NCP now.. Published on: 25 July 2022, 04:36 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters