1. इतर बातम्या

सोने चांदीत गुंतवणूक करण्याचा उत्तम काळ! सोने 50 हजाराच्या खाली,चांदीत देखील एका महिन्यात 14 टक्क्यांनी घसरण

जे गुंतवणूकदार सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूक करतात अशा गुंतवणूकदारांसाठी हा सोने खरेदीसाठी उत्तम काळा असून वायदा बाजार आणि देशातील सराफा बाजारातही सोने-चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झाली आहे. जर आपण वायदा बाजाराचा विचार केला तर सोन्याचे दर पंधरा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर असून चांदी देखील पार धारातीर्थ पडली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
decrease gold and silver

decrease gold and silver

 जे गुंतवणूकदार सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूक करतात अशा गुंतवणूकदारांसाठी हा सोने खरेदीसाठी उत्तम काळा असून वायदा बाजार आणि देशातील सराफा बाजारातही सोने-चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झाली आहे. जर आपण वायदा बाजाराचा विचार केला तर सोन्याचे दर पंधरा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर असून चांदी देखील पार धारातीर्थ पडली आहे.

. हे प्रामुख्याने  डॉलर भक्कम झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. जर आपण सोन्याच्या भावाविषयी जागतिक बाजाराचा विचार केला तर सोने 1680 डॉलर प्रति औंसच्या खालच्या स्तरावर आले असून चांदी देखील 18.62डॉलर आहे.

नक्की वाचा:Gold Rate Update:सोने पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर,48 हजारांवर येऊ शकते सोने

दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून 49 हजार 703 रुपयांवर आला असून चांदी देखील 1468 रुपयांनी खाली आली असून 54 हजार 151 रुपये प्रति किलो या स्तरावर आली आहे.

जर आपण चांदीच्या किमतीमधील विचार केला तर एका महिन्याच्या कालावधीत तब्बल चौदा टक्‍क्‍यांनी किमती कोसळल्या आहेत. जागतिक बाजारात मंदीची परिस्थिती असल्यामुळे कंपन्यांकडून मागणी कमी झाल्याचा हा परिणाम असल्याचे या क्षेत्रातील बाजार तज्ञांनी सांगितले.

नक्की वाचा:8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार इतका पगार, जाणून घ्या....

 पुढच्या काळात कशी असू शकते परिस्थिती?

 बाजार तज्ञ यांच्या मतानुसार जागतिक बाजारात डॉलर भक्कम झाल्याचा परिणाम सोने-चांदीचा किमतींवर पुढे देखील पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच बाजाराच्या चढ उतारानुसार सध्या गुंतवणूकदार डॉलर मध्ये पैसे गुंतवत आहेत व सोने चांदीत केलेली गुंतवणूक काढून घेत आहेत.

त्यातच महत्त्वाचे कारण म्हणजे भारत सरकारने सोने आयातीवर शुल्कात वाढ केल्यामुळे सोन्याच्या विक्रीत प्रचंड घट झाली असून याचा परिणाम सोन्याच्या किमती आणखी घसरण्यावर होईल.

नक्की वाचा:काय सांगता ! कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण ; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? वाचा..

English Summary: decrease price of gold and silver due to some international market policy Published on: 23 July 2022, 01:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters