1. इतर बातम्या

'या' योजनेतून शेतकऱ्यांना मिळतील ३६ हजार रुपये ? काय आहे ही योजना वाचा सविस्तर

देशामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे ११.५ कोटी शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. या रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जर तुमचा समावेश असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकारकडून सुरु केलेल्या वार्षिक पेन्शन योजनेचा मोफत फायदा घेऊ शकता.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
किसान पेन्शन स्कीम(

किसान पेन्शन स्कीम(

देशामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे ११.५ कोटी शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. या रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जर तुमचा समावेश असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकारकडून सुरु केलेल्या वार्षिक पेन्शन योजनेचा मोफत फायदा घेऊ शकता.

या योजनेसाठी तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे कागदपत्र घेतले जाणार नाही. या योजनेचा विचार केला तर वृद्धावस्थेत योजना फारच आधार देणारी ठरत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीएम किसान योजनेद्वारे मिळणार्‍या सहा हजार रुपयांमधून मानधन योजनेसाठी पैसे कापले जातात. यासाठी खिशातून कोणताही जास्तीचा पैसा खर्च करण्याची गरज नाही.किसान पेन्शन स्कीम( पीएम केएमवाय) या योजनेत १ जानेवारी २०२१ पर्यंत २१ लाख १० हजार २०७ लोकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. या किसान पेन्शन स्कीम भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीकडून चालवली जाते.

हेही वाचा :कुसुम योजनेअंतर्गत १० टक्के रक्कम भरुन शेतात बसवा कृषी सौर पंप

 

 काय आहे ही योजना?

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या वयाच्या  ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन दिली जाईल. सरकारने या योजनेचा लाभ देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना देण्याचा योजना बनवली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत.

हेही वाचा : जाणून घ्या !काय आहे ग्रामीण गोदाम योजना; कशी मिळवाल २५ टक्के सब्सिडी

 या योजनेविषयी महत्त्वाच्या गोष्टी

 या योजनेसाठी कमीत-कमी प्रीमियम ५५ रुपयांपासून ते २००  रुपयांपर्यंत आहे. तसेच पॉलिसी होल्डर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर संबंधित शेतकऱ्याच्या पत्नीला ५० टक्के म्हणजे महिन्याला १५००  रुपये पेन्शन मिळेल. जर कोणत्या शेतकऱ्याला पॉलिसी मध्येच थांबायची असेल तर थांबवण्याच्या कालावधीपर्यंत जमा झालेला पैसा व त्यावरचे व्याज मिळते. या योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी

 या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्विस सेंटर अर्थात सीएससीमध्ये जाऊन नोंदणी करावी. आधार कार्ड या योजनेसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला सातबारा उताऱ्याची प्रत द्यावी लागते, तसेच सोबत दोन फोटो आणि बँक पासबूक असणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर किसान पेंशन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड बनवले जाते.

English Summary: Farmers will get Rs 36,000 from this scheme? Read this plan in detail Published on: 02 January 2021, 06:27 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters