1. इतर बातम्या

भूमिहीन, मजूर, गरिबांसाठी एलआयसीची खास योजना; जाणून घ्या! पात्रता

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एलआयसीने खास योजना आणली आहे. आम आदमी विमा योजना या नावाने एलआयसी सामाजिक सुरक्षिततेसाठी एक पॉलिसी चालवत आहे.

KJ Staff
KJ Staff


असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एलआयसीने खास योजना आणली आहे.  आम आदमी विमा योजना  या नावाने एलआयसी सामाजिक सुरक्षिततेसाठी एक पॉलिसी चालवत  आहे.  आम आदमी विमा योजनेला भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने लागू केले आहे. या योजनेद्वारे भूमिहीन कुटुंबातील लोकांना लाइफ इन्शुरन्सबरोबर अन्य प्रकारच्या सुविधाही दिल्या जातात.

     काय आहे आम आदमी योजनेसाठीची पात्रता

या योजनेसाठी पात्र अर्जदाराचे कमीत-कमी वय १८ ते ५९  वर्षाच्या आत असावे. लाभार्थी हा परिवाराचा कुटुंबप्रमुख असावा. लाभार्थी कुटुंबांमध्ये कमावणारा फक्त एकच व्यक्ती असावा. तसेच अर्जदार हा भूमिहीन परिवारातील असणे आवश्यक आहे. अर्जदार हा राज्यातील कुठल्याही ग्रामीण भाग अथवा शेरी भागांमधून अर्ज करू शकतो.

  या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहेत

या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदाराजवळ रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळेच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स,  वोटर आयडी, सरकारी विभागाद्वारे दिले गेलेले ओळखपत्र,  आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.

  आम आदमी योजनेद्वारे काय मिळतात फायदे

  • विमा सुरक्षाच्या काळामध्ये एखाद्या सदस्यचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यावेळी लागू विमा योजनेच्या अंतर्गत ३० हजार रुपये नॉमिनीला मिळतील.
  • अगर विमा कवच असलेले व्यक्तीचा मृत्यू अपघातामुळे किंवा किंवा शारीरिक अपंगत्वामुळे जर झाला. तर पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला ७५ हजार रुपये विमा राशी दिली जाते.
  • अंशकालीन अपंगत्व असेल तर पॉलिसीधारकाला  किंवा त्याच्या नॉमिनीला ३७ हजार ५०० रुपये दिले जातात.
  • स्कॉलरशिप बेनिफिटच्या अंतर्गत या विमा योजनेद्वारे इयत्ता ९ ते १२ मध्ये शिकणाऱ्या जास्तीत-जास्त दोन मुलांना ३०० रुपये प्रति एक मुलगा इतकी स्कॉलरशिप देण्यात येते.

   या योजनेसाठी असलेला विमा हप्ता

 जर आपला विमा ३० हजार रुपयांचा असेल तर २०० रुपये प्रति वर्ष इतका विमा हप्ता द्यावा लागतो.  तसे पाहायला गेले तर १०० रुपये विमा हप्ता भरावा लागतो कारण बाकीचे ५० % सिक्युरिटी फंडामधून राज्य सरकारद्वारे दिले जातात.

English Summary: LIC's special scheme for laborers and poor people; know eligibility Published on: 21 October 2020, 01:06 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters