पीएम किसान योजना : बँक खात्यात पैसे नाही आले तर करा मोबाईलवरुन तक्रार, कुठे कराल संपर्क

28 December 2020 12:42 PM By: KJ Maharashtra


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशातील 9करोड शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत खात्यात पैसे जमा केले. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत. परंतु तुम्ही शेतकरी असून या योजनेसाठी ची अहर्ता प्राप्त करत आहात, परंतु अजून पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुमची खात्याची स्टेटस तुम्ही तपासू शकता. तुम्हाला https://pmkisan.gov. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. या संकेत स्थळावर पेजच्या उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर चा पर्याय दिसेल. या पर्यायांमध्ये बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून नवीन पेज ओपन होईल. ओपन झालेल्या नवीन पेजवर तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता. आधार नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून गेट डाटा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या ट्रांजेक्शन विषयी माहिती मिळते. सातव्या हप्त्या  विषयी सविस्तर माहिती ही मिळेल.

जर तुम्हाला एफ टीओ इस जनरटेड अंड पयमेंत कन्फर्मेशन इस पेंडिंग असा दिसल तर समजायचे की ट्रान्सफर ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील.

हेही वाचा : पीएम किसान पोर्टलवरुन दोन कोटी पेक्षी शेतकऱ्यांना हटवले, यात तुमचा तर समावेश नाही ना, कशी पाहावी लिस्ट

 

कोणत्या नंबरवर तक्रार करावी?

 काही शेतकऱ्यांचे नावे मागच्या वेळेस लिस्टमध्ये होते. परंतु नवीन लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्ही पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर तक्रार दाखल करू शकतात. हेल्पलाइन नंबर पुढील प्रमाणे-011-24300606

  मंत्रालय संपर्क क्रमांक

 पी एम किसान टोल फ्री नंबर-18001155266

 पी एम किसान हेल्पलाइन नंबर-155261

 पी एम किसान लँडलाईन नंबर-01123381092, 23382401

दरम्यान बऱ्याच वेळा पीएम किसान योजना म्हणजेच शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज भरताना अर्जदाराकडून अनेक चुका होत असतात. कधी अर्जात दुसरे तर आधार कार्डवर दुसरे नाव असते. तर बरेच अर्जदार आपल्या जन्म दिनांकात चूक करत असतात.

पंतप्रधान किसान योजना फॉर्म २०२० सुधारित करण्याची प्रक्रिया-

  • प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • आपल्या स्क्रीनवर एक वेब पृष्ठ दिसून येईल.
  • मेनू बारवरील किसान शेतकरी टॅबवर क्लिक करा.
  • ड्रॉप डाऊन सूचीतील शेतकरी तपशील संपादित करा पर्यायावर क्लिक करा. आपला आधार क्रमांक आणि संबंधित फील्डमध्ये कॅप्चा कोड नमूद करा.
  • शोध बटणावर क्लिक करा. पुढील माहिती अपडेट करा.
PM Kisan Samman Nidhi Yojana PM Kisan Yojana complaint number पीएम किसान सन्मान योजना पीएम किसान योजना complaint number
English Summary: PM Kisan Yojana: If there is no money in the bank account, make a complaint from your mobile, where will you contact?

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.