मेष
मानसिक आणि शारीरिक आरोग्य (physical health) संतुलित राखा. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठई मित्रमंडळींची मदत लाभेल. इतरांकडून अपेक्षा करू नका. जवळच्या लोकांचा सल्ला पाठवण्याची गरज भासेल. रिकामा वेळ वाया घालवू नका. अन्नदान करा. शुभरंग : पोपटी
वृषभ
दात स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करा. मित्रमैत्रिणींसोबत (Friends) फिरायला जाल. नातेवाईकांकडून अनपेक्षित गोड बातमी कानी येईल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. उगाचच काळजी करू नका. शुभरंग : मोरपिसी
मिथुन
त्रिफळा चूर्णाचा वापर करा. शारीरिक उत्साह टिकून राहील. आवडीनिवडी जपा. स्वत:साठी वेळ काढाल. आजचे काम उद्यावर ढकलू नका. आवडता पोषाख परिधान करा. शुभरंग : सोनेरी
कर्क
सकारात्मक राहा. आर्थिक मदत (financial help) मिळेल. ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. आपली मते इतरांवर लादू नका. कुटुंबियांना वेळ देण्याचा प्रयत्न कराल. आवडते रोपटे परसात लावा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. शुभरंग : जांभळा
सिंह
अंघोळीच्या पाण्यात कापूर घाला. अनावश्यक बडबड करू नका. मानसिक संतुलन ढळू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. उधळपट्टी करू नका. भावनांना आवर घाला. शुभरंग : खाकी
Bird Flue: कुक्कुटपालकांसाठी आनंदाची बातमी; शास्त्रज्ञांनी लाँच केली बर्ड फ्लूची पहिली लस
कन्या
पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल. आवडत्या व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. एखाद्या गोड आठवणीमुळे क्षुल्लक भांडण मिटून जाील. आवडत्या पुस्तकाचे वाचन करण्यात वेळ घालवाल. शुभरंग : राखाडी
तूळ
सायंकाळी फिरायला जाल. बोलण्यापूर्वी विचार करा. अडचणीच्या वेळी भावंडांची मदत मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभरंग : आकाशी
वृश्चिक
मारुतीचे दर्शन घ्या. आजचा दिवस प्रसन्नदायी आहे. मनाला शांत ठेवण्यासाठी एकांतात राहणे पसंत कराल. लोकांच्या सल्ल्यामुळे अडचणीत येऊ शकता. ध्यानधारणा करा. स्वत:साठी वेळ काढाल. शुभरंग : काळा
धनु
शिवलिंगावर अभिषेक करा. चिंता करू नका. जागाविषयक मालमत्तेत पैसे गुंतवावेसे वाटतील. आजचा दिवस प्रसन्नदायी आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. शुभरंग : चंदेरी
Agricultural Business: ऐकलं व्हयं! सर्पगंधा लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न; जाणून घ्या...
मकर
सूर्याला अर्घ्य द्या. घरात समारंभाचे आयोजन कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. मनोरंजानाचे कार्यक्रम बघण्यासाठी वेळ काढाल. आर्थिक गुंतवणुकीचा लाभ घ्याल. महत्त्वाच्या लोकांसोबत भेटीगाठी होतील. शुभरंग : सोनेरी
कुंभ
पांढरे फूल प्रेयसीला भेट द्याल. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गुंतवणूक करण्यासाठी घाईगडबडीत करू नका. मित्रमैत्रिणींसाठी वेळ काढाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभरंग : खाकी
मीन
गायत्री मंत्राचे वाचन करा. स्वास्थ्य उत्तम राहील. आवडता पोषाख परिधान करा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. मोगऱ्याचा गजरा केसात माळा. आवडत्या व्यक्तिशी मनमोकळ्या गप्पा माराल. आहाराविहाराची पथ्ये सांभाळा. शुभरंग : पिवळा
महत्वाच्या बातम्या
Organic Farming: सेंद्रिय भाजीपाला महाग का होतोय? कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल
Fertilizers: शेतकरी मित्रांनो सावधान! खतांच्या अतिवापरामुळे पिकांचे होतेय मोठे नुकसान
Eknath Shinde: पूरग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिला शब्द; म्हणाले...
Share your comments