1. इतर बातम्या

Horoscope: गणपतीत 'या' लोकांचे सोनेरी दिवस सुरू होणार; कारण बाप्पाची असते विशेष कृपा

यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीत भ्रमण करत आहे आणि सूर्याशी संयोग करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Horoscope

Horoscope

यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीत भ्रमण करत आहे आणि सूर्याशी संयोग करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करत आहे.

सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि तो सिंह राशीत आधीपासूनच आहे. शुक्र धन, सौंदर्य, प्रेमाचा कारक आहे आणि सूर्य यश, आत्मविश्वास, आरोग्य देतो.

अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या संयोगाचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. यापैकी 4 राशी अशा आहेत की त्यांना देवी लक्ष्मीच्या कृपेने भरपूर पैसा मिळेल.

मेष

शुक्राचे संक्रमण (Transit of Venus) मेष राशीच्या लोकांना जोरदार लाभ देईल. त्यांच्या जीवनात सुख-सुविधा वाढतील. वडिलांकडून मदत मिळेल ज्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. गुंतवणुकीत अतिरिक्त पैसा लावा. कोणतीही भेटवस्तू मिळू शकते.

दिवसाला फक्त 45 रुपये वाचवून 25 लाखांचे मालक व्हा; एलआयसीची 'जीवन आनंद योजना' देत आहे संधी

वृषभ

या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा राशी बदल खूप शुभ राहील. त्यांची आर्थिक प्रगती होईल. हातात पुरेसे पैसे मिळाल्याने तुम्हाला आराम वाटेल. आदर वाढेल. तुम्हाला कुठूनही चांगली बातमी मिळू शकते.

खरीप पिकांमध्ये आंतरमशागतीचे नियोजन करा तंत्र पद्धतीने; चांगल्या उत्पादनासाठी होणार मदत

सिंह

शुक्र आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करत आहे. या राशीत शुक्र आणि सूर्याची युती या लोकांना खूप लाभ देईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. पगार वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरमध्ये प्रगती आनंद देईल.

 

कुंभ

शुक्राचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांचे जीवन आनंदाने भरून टाकेल. त्यांना प्रेम, पैसा, आदर सर्वकाही मिळेल. धनलाभ होईल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

महत्वाच्या बातम्या 
ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता; असे करा नियंत्रण
शेतकऱ्यांचे अच्छे दिन; सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तुरीचे दर वाढणार 3 हजार रुपयांनी
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास मिळणार 20 लाख रुपये

English Summary: Horoscope people Ganapati Bappa special grace Published on: 30 August 2022, 04:37 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters