1. सरकारी योजना

शेतकरी मित्रांनो आता घराच्या छतावरच तयार करा वीज; सरकार देतंय 50 हजारांपर्यंत अनुदान

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. यामधीलच एक योजना म्हणजे सोलर रफटफ योजना.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Farmer electricity

Farmer electricity

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (scheme) राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. यामधीलच एक योजना म्हणजे सोलर रफटॉप योजना.

सध्या शेतकऱ्यांचे वीज बिलामुळे आर्थिक बजेट (Financial budget) ढासळले आहे. वीज बील जास्तीच येत असल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा स्थितीत सरकार घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

फायदे

1) ही सोलर रुफटॉप सबसिडी (Solar Rooftop Subsidy) स्कीम सर्वसामान्यांसाठी अनेक बाबतीत फायदेशीर आहे. या योजनेंतर्गत सौर पॅनेल बसवण्याचा खर्च कमी आहे, कारण त्यातील काही भाग सरकारकडून अनुदान म्हणून उपलब्ध आहे.

2) केंद्र सरकारशिवाय अनेक राज्य सरकारेही त्यांच्या वतीने अतिरिक्त अनुदान देत आहेत. सोलर पॅनल बसवल्याने वीज बिलाचा त्रास संपतो. तुमच्या घरातील दैनंदिन वापरासाठी वीज (electricity) तुमच्या छतावरील सोलर पॅनेलमधून तयार केली जाते.

शेतकऱ्यांचे अच्छे दिन; सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तुरीचे दर वाढणार 3 हजार रुपयांनी

3) आणि याचा तिसरा फायदा म्हणजे या योजनेत कमाईच्या संधी आहेत. घराच्या छतावरील सोलार पॅनल तुमच्या गरजेपेक्षा जास्त वीज बनवत असतील तर वीज वितरण कंपन्या तुमच्याकडून ती विकत घेतील. अशाप्रकारे, सोलर रूफटॉप सबसिडी योजना एकाच वेळी तीन जबरदस्त फायदे देते.

4) तुमच्या घराच्या सर्व गरजा सौर पॅनेलने (solar panel) पूर्ण केल्याने तुम्ही दरमहा सुमारे ४,२३२ रुपयांचे वीज बिल वाचवाल. एका वर्षासाठी, बचत 50,784 रुपये होते. म्हणजेच तुमचा संपूर्ण खर्च अडीच वर्षांत वसूल होईल. 25 वर्षात तुमची एकूण बचत सुमारे 12.70 लाख रुपये असेल.

ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता; असे करा नियंत्रण

या ठिकाणी करा अर्ज

तुम्ही 2kW चा सोलर पॅनल (solar panel) बसवला तर त्यासाठी सुमारे 1.20 लाख रुपये खर्च येईल. 3 kW पर्यंत सौर रूफटॉप पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून 40 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध आहे.

अशा परिस्थितीत तुमचा खर्च 72,000 रुपयांपर्यंत खाली येईल आणि तुम्हाला सरकारकडून 48,000 रुपयांची सबसिडी मिळेल. सौर रूफटॉप बसवण्यासाठी, तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in/ ला भेट देऊन अर्ज करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो सावधान! उसावरील विषारी अळी जीवाला पोहचवतेय हानी
पोस्ट ऑफिसच्या योजनेतील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; सरकार व्याजदरात करणार मोठी वाढ
गणपतीत 'या' लोकांचे सोनेरी दिवस सुरू होणार; कारण बाप्पाची असते विशेष कृपा

English Summary: Farmer electricity roof Government subsidy 50 thousand Published on: 31 August 2022, 11:16 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters