मागील काही महिन्यांपूर्वी कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या प्रयत्नामुळे पश्चिम महाराष्ट्रमधील ऊस कारखान्याची तोड उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झालेली होती जे की यामुळे तेथील ऊस उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला होता. ऊसतोड कामगार गावामध्ये दाखल होताच त्यावर स्वागत ढोल ताशा पथकाने केले होते. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवढा अतिरिक्त ऊस आहे त्या उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता पश्चिम महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे. शिल्लक उसाचे क्षेत्र तसेच उसतोडीचे नियोजन केले जाणार आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हाच एक पर्याय राहिला असून याबाबत प्रस्ताव थेट साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलेला आहे. साखर आयुक्त यांनी जर यास मंजुरी दिली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उसतोडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक अतिरिक्त ऊस :-
काळाच्या ओघात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र वाढवले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ११ साखर कारखान्यांनी उसगाळप केला असला तरी अजून ऊस शिल्लक आहे. यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे जरी साखर कारखान्यांना अधिक ऊसक्षेत्र गाळप केले असले तरी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाडाकडे दुष्काळी भाग म्हणून पाहिले जाते मात्र मागील पाच वर्षांपासून दुष्काळी ही ओळख पुसण्यात शेतकऱ्यांना यश मिळाले आहे. यंदा योग्य नियोजन झाले नसल्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न उदभवला आहे.
नेमका काय आहे प्रस्ताव :-
पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप झाल्यातच जमा आहे, आणि जे शिल्लक क्षेत्र आहे ते वेळेवर तोडले जाईल मात्र येथील ऊसतोड कामगार मराठवाड्यात गेले नाही तर. अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथील कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी माहिती सुद्धा दिलेले आहे की साखर आयुक्त स्तरावरुन आदेश निर्गमित करण्यासाठी प्रस्ताव देखील दाखल झालेला आहे.
20 टक्के ऊस फडातच :-
मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, लातूर तसेच जालना या जिल्ह्यातील उसाचा अतिरिक्त प्रश्न कायमच आहे. जो पर्यंत उसाची तोड होत नाही तो पर्यंत उसाचे गाळप बंद करायचे नाही असे आदेश साखर आयुक्त शेखर गगायकवाड यांनी दिलेले आहेत. जरी साखर कारखाने सुरू राहील तरी उसतोडीचा कायमचा प्रश्न मिटतोय की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या स्थितीला सुद्धा २० टक्के ऊस फडातच राहिला असून पावसाळा जरी सुरू झाला तरी उसाचा प्रश्न मार्गी लागणार की नाही असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. जर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची मदत घेतली तर हा प्रश्न मार्गी लागेल.
Share your comments