सध्या राज्यात राजकीय नाट्यघडामोडी चालू आहे. अस असलं तरी कांदा उत्पादक संघटनेवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. या परिस्थितीतही कांदा उत्पादक संघटनेने कांद्याला 500 रुपये अनुदान मिळवून देण्याची मागणी मात्र कायम ठेवली आहे. कांदा दराच्या लहरीपणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्याच्या घडीला कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कित्येक कांदा उत्पादकांनी कांदा फुकटात वाटून टाकला तर कोणी जाळून टाकला.
काही शेतकरी तर जनावरांना कांदा खाऊ घालत आहेत. कांद्याचे दर घसरल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले. राज्य सरकारकडे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान मिळवण्यासाठी जोरदार पाठपुरवठा केला जाईल आणि ते मिळवले जाईलच अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकार , कांदा उत्पादक शेतकऱ्यांनच्या मागण्या पूर्ण करणार का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
कांदा उत्पादकांसमोरील आव्हाने
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शिवाय सरकारने याबाबतचे कोणतेच धोरण आखले नाही. कांदा निर्यातीचे धोरण तसेच कांदा दराबाबतच्या इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत केंद्र सरकारकडे मागण्या सुरूच राहतील. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने प्रति क्विंटल 500 रुपये द्यावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
FICCI ने कृषी रसायनांवरील GST 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे केले आवाहन
शेतकऱ्यांना देणार 50 हजार...
सध्या राज्यात राजकीय क्षेत्रात उलथापालथ झाली असली तरी बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्सानपर अनुदान देण्याची मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कांद्याच्या अनुदनाबाबत निर्णय घेण्यात यावा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे हीच कांदा उत्पादक संघटनेची मागणी कायम राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो 12वा हप्ता घ्यायचा असेल तर 'हे' काम करणे गरजेचे..
पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली; पुढचा पंधरवडा महत्वाचा
Share your comments