1. सरकारी योजना

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो 12वा हप्ता घ्यायचा असेल तर 'हे' काम करणे गरजेचे..

PM Kisan Yojana: गेल्या महिन्यात सरकारने 11 व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांकडे वर्ग केली आहे. देशातील 12 कोटीहुन अधिक पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर येतं आहे.

PM Kisan Yojana: गेल्या महिन्यात सरकारने 11 व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांकडे वर्ग केली आहे. देशातील 12 कोटीहुन अधिक पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर येतं आहे.

पीएम मोदी (PM Modi) लवकरच पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता जारी करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये जोर पकडू लागली आहे.

12वा हप्ता हवा असेल तर आधी हे काम करा

आता जर तुम्हाला बारावा हप्ता हवा असेल तर आधी हे काम करा. सरकारने अलीकडेच ई-केवायसीची ( eKYC) अंतिम मुदत 31 मे ते 31 जुलै 2022 पर्यंत वाढवली आहे. जे शेतकरी 11 तारखेनंतर 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यांनी ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे.

Kisan Sabha App: आता घरी बसून बाजारात विकता येणार शेतमाल; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

घरी बसून ई-केवायसी पूर्ण करू शकता

1. यासाठी PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा.

2. येथे तुम्हाला शेतकऱ्यांच्या (Farmer) कोपऱ्यावर प्रथम eKYC ची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल.

3. येथे तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि शोध बटणावर क्लिक करा.

4. यानंतर मोबाईल नंबर टाका, इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की तुम्हाला तोच नंबर टाकावा लागेल जो आधारशी लिंक आहे.

5. यानंतर OTP टाका. त्यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल.

6. तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करण्यात काही अडचण आल्यास तुम्ही आधार सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.

खरीपातील चारा पिकाचे लागवड तंत्र

English Summary: PM Kisan Yojana: If farmers want to take 12th installment, they need to work Published on: 24 June 2022, 09:32 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters