गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत आहे. असे असताना आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यात ऐतिहासिक शेतकरी संपाचे गाव असणाऱ्या (Puntamba) पुणतांबा येथे काल विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे याकडे सर्व राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन या सभेत आंदोलनाची दिशा ठरवली आहे.
यामध्ये येथील ग्रामस्थांनी (Maharashtra) राज्यभरातल्या (Farmer) शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन एक निवेदन राज्य सरकारला दिले आहे. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याचे सांगितले गेले आहे. यामध्ये राज्य सरकारने 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा 5 वर्षानंतर आंदोलनाची मशाल पेटवण्याची भुमिका एकमताने घेण्यात आली आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणतांब्याच्या शेतकरी संपाला एक वेगळे महत्व आहे, जेव्हा देवेंद्र फडणवीस 2017 साली मुख्यमंत्री होते, तेव्हा देखील येथेच आंदोलन पेटले आहे. यामुळे या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या ग्रामसभेत शिल्लक राहणाऱ्या उसाला हेक्टरी 2 लाख अनुदान द्यावे , कांद्याला हमीभाव देत 500 रुपये अनुदान देण्याची मागणी तसेच दिवसा 10 ते 12 तास पूर्ण दाबाने वीज मिळावी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का, कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला स्थगिती
यामध्ये राज्य सरकारला सात दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला असुन मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास 1 ते 5 जून धरणे आंदोलन आणि त्यानंतरही आक्रमक स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता 1 जून पासून आंदोलनाला सुरवात झाली तर राज्यभरातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे अवाहन केले जाणार आहे.
"स्वतः कारखाना चालवण्याची वेळ येते तेव्हा सगळे मागे सरकतात, हा अनुभव मला आहे"
याठिकाणी २०१७ मध्ये अनेक शेतकरी आले होते, यामुळे या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आता यावेळी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1 जूननंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाला सुरवात होणार आहे. यामध्ये पुढील अजून मोठ्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो तापमानवाढीचा पशुधनावरील दुष्परिणाम, आणि उपाय जाणून घ्या
योगी सरकारचा मोठा निर्णय! घरातील एका सदस्याला मिळणार नोकरी, जाणून घ्या योजना
'सदर जमीन ही वादग्रस्त आहे, ही जमीन रक्त मागत आहे'
Share your comments