1. बातम्या

आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश! कर्जत तालुक्यातील 'या' गावच्या शेतकऱ्यांना मिळणार वीस वर्षापासून रखडलेल्या भूसंपादनाचा मोबदला

गेल्या वीस वर्षापूर्वी कुकडी डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या कर्जत तालुक्यातील राक्षस वाडी बुद्रुक, कोरेगाव व करपडी येथील शेतकऱ्यांना अजून पर्यंत संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
in karjat taluka farmer get fund to land aquisition before 20 years effort to rohit pawar

in karjat taluka farmer get fund to land aquisition before 20 years effort to rohit pawar

गेल्या वीस वर्षापूर्वी कुकडी डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या कर्जत तालुक्यातील राक्षस वाडी बुद्रुक, कोरेगाव व करपडी येथील शेतकऱ्यांना अजून पर्यंत संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता.

अखेर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी या विषयात स्वतः लक्ष घातले आणि  शेतकऱ्यांना मोबदला मिळवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले असून वीस वर्षापूर्वी कुकडीच्या डाव्या कालव्यात संपादित झालेल्या कर्जत तालुक्यातील या  गावातील शेतकऱ्यांना चार कोटी 32 लाख रुपये एवढी रक्कम सरकारने मंजूर केली आहे. राज्य सरकारतर्फे वीस वर्षानंतर शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या वीस वर्षात संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना केवळ पाच ते सहा कोटी रुपये रक्कम मंजूर झाली होती. परंतु रोहित पवार आमदार झाल्यानंतर त्यांनी शासनाकडून तब्बल 140 कोटींच्या आसपास रक्कम मंजूर करून आणली. यातून शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा मोबदल्याचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागतोच शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आल्यानंतर तालुक्यातील आर्थिक उन्नती होईल.

या प्रश्नासाठी रोहित पवार यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना या बाबतीत शब्द दिला होता की त्यांना त्यांचा हक्काचा मोबदला शासनाकडून मिळवून देण्यात येईल, हा शब्द रोहित पवार यांनी पाळत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावला आणि आता शेतकऱ्यांनात्यांच्या हक्काच्या भूसंपादनाची रक्कम मिळणार आहे. येणाऱ्या काळात देखील नागरिकांच्या सोयीसाठी सतत झटत राहिले दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी व प्रलंबित विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करील असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार असून या मतदारसंघातील विविध प्रश्न तडीस लावण्यासाठी कायम झटत असतात.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून वीस वर्षांपूर्वी भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:10 वी उत्तीर्ण आहात! तर भारतीय पोस्ट खात्यात चालून आली आहे नोकरीचे मोठी संधी, वाचा सविस्तर माहिती

नक्की वाचा:साध्या भातापेक्षा जास्त पोषणमूल्य असलेल्या रंगीत भाताचा प्रयोग यशस्वी, वाचा रंगीत भाताचे वैशिष्ट्य

नक्की वाचा:"राजीव गांधी कृषिरत्न हा पुरस्कार म्हणजे मातीमध्ये राबणाऱ्या अन्नदात्याचा सन्मान-श्री.अमर तायडे(केवीके घातखेड,अमरावती)

English Summary: in karjat taluka farmer get fund to land aquisition before 20 years effort to rohit pawar Published on: 05 May 2022, 09:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters