1. बातम्या

कारखाना आणि उसाच्या शेतातील अंतराने घेतला शेतकऱ्याचा बळी, अंतर होते फक्त २५ किलोमीटर, कारखान्यावर कारवाई करा

राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. उस तुटला जात नाही म्हणून बीड येथील गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती, यामुळे राज्य सरकारवर आणि कारखान्यावर टीका होत आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
distance factory sugarcane field victim farmer

distance factory sugarcane field victim farmer

राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. उस तुटला जात नाही म्हणून बीड येथील गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती, यामुळे राज्य सरकारवर आणि कारखान्यावर टीका होत आहे. यामुळे हा प्रश्न अधिकच तीव्र होत चालला आहे.

ऊसाच्या फडापासून केवळ 25 किमी अंतरावर (Sugar Factory) साखर कारखाना असताना नामदेव जाधव यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले होते. यामुळे फक्त २५ किलोमीटरसाठी एखाद्या शेतकऱ्याचा जीव जात असेल तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असे असताना आता या घटेनच्या निषेधार्थ विविध संघटना समोर आल्या आहेत. अनेक राजकीय नेते त्यांच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी देखील जात आहेत.

यासाठी आता शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन लाल बावटा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले. नामदेव जाधव यांनी ऊस फडातच राहिल्याने आत्महत्या केली त्या ऊसाच्या फडापासून साखर कारखाना अवघ्या 25 किलोमीटरवर होता. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लाल बावटा संघटनेने केली आहे. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

आताची सर्वात मोठी बातमी! पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारने थेट तारीखच सांगितली..

तसेच हजारो शेतकऱ्यांचा गेल्या दोन वर्षापासून पीकविमा रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांचा कारभार हा केंद्र सरकारच्या माध्यमातून चालतो मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकार तत्पर नसल्याचेच समोर येत आहे. असाही आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे आता तरी याबाबत निर्णय मार्गी लागणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या साखर कारखान्याचे योग्य नियोजन नसल्यानेच अतिरिक्त उसाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
7th pay commission: मोठी बातमी! 5 दिवसांत हे काम करा अन्यथा पेन्शन रखडणार, सरकारचा इशारा..
बचत गटातील महिलांनी करून दाखवले! शेतकरी महिला गटाचा तांदूळ, आंबा महोत्सवास मोठा प्रतिसाद
आता एलआयसीने फसवले! पाच मोठ्या कंपन्यांमधूनही पडली बाहेर, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले

English Summary: distance factory sugarcane field victim farmer, the distance is only 25 kilometers, take action on the factory Published on: 21 May 2022, 04:17 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters