1. बातम्या

हनुमान चालिसानंतर आता शेतकरी चालीसा, तुमचे भोंगे बंद करा असे म्हणत शेतकऱ्यांनी ...

आपल्या वेदना, समस्या सरकारपर्यंत पोहचाव्यात म्हणून हे महाआरती आंदोलन करण्यात आले आहे. यात परभणीचे शेतकरी नेते माणिक कदम व विनायकराव पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी वेदनांची महाआरती या आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
वेदनांची महाआरती आंदोलन

वेदनांची महाआरती आंदोलन

सध्या राजकीय भोंग्याची चर्चा सगळीकडेच चालू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या राजकीय भोंग्यात गुंतले असताना शेतकऱ्यांनी मात्र आपल्या 'वेदनांची महाआरती आंदोलन' सुरू केलं आहे. भोंगा प्रकरणांद्वारे शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा राजकीय डावपेच आहे असा आरोप करत बुधवारी शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आपल्या वेदनांची महाआरती केली.

आपल्या वेदना, समस्या सरकारपर्यंत पोहचाव्यात म्हणून हे महाआरती आंदोलन करण्यात आले आहे. यात परभणीचे शेतकरी नेते माणिक कदम व विनायकराव पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी वेदनांची महाआरती या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. सध्या राज्यात राजकीय मंडळी एकमेकांवर जातीवादाचे तसेच भ्रष्टाचाराचे आरोप करत भांडत आहेत मात्र हे वाद शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाहीत.

भोंगे,हनुमान चालीसा, हिंदू मुस्लिम हे शेतकऱ्यांचे मुद्दे नसून सध्या अवकाळी पावसामुळे हंगामी पिकांचे झालेले नुकसान, विजेचा प्रश्न, उसाच्या पिकाचा गंभीर प्रश्न, इंधनवाढ,महागाई, शेतकरी आत्महत्या असे एक ना अनेक मुद्दे आणि त्यावरील उपाययोजना महत्वाच्या आहेत. मात्र या परिस्थितीत कोणाकडे न्याय मागावा. सरकारपर्यंत आपल्या वेदना कशा पोहचतील यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनात मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते शिवाय प्रमुख राजकीय नेत्यांच्या नावाने शेतकऱ्यांकडून धान्य,फळे,भाजीपाला, मिठाईची टोकरी पाठवली.

शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी! लिंबाची शेती केली अन अवघ्या तीन महिन्यात झाले लखपती

यावेळी तुमचे राजकीय भोंगे थांबवा आणि आमचे प्रश्न सोडवा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांतीपूर्वक मार्च काढला.यामध्ये बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी वारकरी संघटना यांसह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी होते. तसेच गांधी पुतळ्याच्या पायरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या नावाची धान्याची टोकरी ठेवण्यात आली.

तसेच, या प्रार्थनासभेतून राजकीय नेत्यांना सद्बुद्धी मिळो आणि शेतकरी समस्यांकडे त्यांचे लक्ष जावो, अशी प्रार्थनादेखील करण्यात आली. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शेतकरी चालीसा म्हटली गेली. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी शेतकरी पथकाला ताब्यात घेतले. त्यांना मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्यांची सुटकादेखील करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या:
Farming Business : शेतकरी मित्रांनो या औषधी वनस्पतीची शेती करू शकते तुम्हाला मालामाल; वाचा याविषयी 
काय सांगता! आता बटाट्यापासून तयार होणार प्लास्टिक; वाचा काय आहे हा माजरा 

English Summary: After Hanuman Chalisa, now the farmers are saying Chalisa, turn off your horns ... Published on: 05 May 2022, 10:06 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters