गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडून राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिंदे गट आणि भाजपमध्ये जाणारांची संख्या वाढली आहे. यामुळे रोज भेटीगाठी सुरू आहेत. भाजपने आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
यामध्ये माढ्याचे आमदार बनन शिंदे (Baban Shinde) आणि मोहोळचे माजी आमदार राजीन पाटील यांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे. असे असताना आता विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्याही भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार महेश शिंदे म्हणाले, आता खळं उठलंय, वस्ती उठायला जास्त वेळ लागणार नाही, असे वक्तव्य केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. रामराजे देखील लवकरच भाजपमध्ये जातील असे बोलले जात आहे. यामुळे आता रामराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात वाढणार नवीन सहकारी कारखाने? कारखान्यांना परवानगी देण्याची मागणी
याबाबत अजित पवार म्हणाले की, बबनदादा शिंदे यांचा फोन आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आला होता. त्यांचे दिल्लीतही कारखाने आहेत. काही कामानिमित्त त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. मी उपमुख्यमंत्री असताना भाजपचेही अनेक आमदार मला भेटण्यासाठी येत होते. तेव्हा तुम्ही आम्हालाही असच म्हणाल का? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला. मात्र येणाऱ्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता कांदा काढणी मशील ठरतेय फायदेशीर, शाहू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची कमाल
एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी 5 कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश
बिग ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, भाजप आता राष्ट्रवादी फोडणार..
Share your comments