1. बातम्या

वाचा तुमचं गाव आहे का यादीत? चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर सोलापूर जिल्ह्यातील 59 गावांमधून जाणार, वाचा सविस्तर

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर एक्सप्रेस हा सोलापूर जिल्ह्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार असून या कॉरिडोर बद्दल सगळ्यांमध्ये खूप उत्सुकता होती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
land acquire process start for chennai greenfield corridor

land acquire process start for chennai greenfield corridor

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर एक्सप्रेस हा सोलापूर जिल्ह्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार असून या कॉरिडोर बद्दल सगळ्यांमध्ये खूप उत्सुकता होती.

हा कॉरिडॉर कोणत्या गावांमधून जाईल याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून होते. परंतु आता  उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची भूसंपादन अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून या कॉरिडॉरसाठी ची भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सोलापूर जिल्ह्यातील 59 गावांमधून सुरू करण्यात येईल अशी माहिती गॅजेट द्वारे देण्यात आली आहे. या 59 गावांची नावे द गॅझेट ऑफ इंडिया च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील 8, बार्शी तालुक्यातील 18, अक्कलकोट तालुक्यातील 17, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोळा अशा एकूण 59 गावांमधून 153 किलोमीटरचे भूसंपादनचेन्नई ग्रीनफिल्ड  कॉरिडॉरसाठी करण्यात येणार आहे.

नक्की वाचा:RBI चा मोठा निर्णय!! आता ATM कार्ड न वापरता ATM मधून काढता येतील पैसे; वाचा कसं…..

आता गॅझेट मध्ये गावांची नावे प्रसिद्ध झाल्याने याबद्दलची उत्सुकता संपली असून आता कोणाच्या शेतातून हा कॉरिडॉर जाईल याबाबत जोरात चर्चा सुरू आहे. याबाबत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने दिली आहे.

 ही आहे गावांची यादी

1- बार्शी तालुका- हा कॉरिडॉर हिंगणगाव येथून बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील प्रवेश करतो. त्यानंतर पुढे लक्षाची वाडी, उपळाई, अलीपुर, कासारवाडी, बळेवाडी, दडशिंगे, कव्हे, पानगाव, ऊंडेगाव, काळेगाव, मानेगाव, वैराग, सासुरे, सर्जापूर, हींगणी, रातंजन आणि चिंचखोपण

नक्की वाचा:श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी राबविले विविध शेतकरी हितोपयोगी उपक्रम

2- अक्कलकोट मधील गावे -चप्‍पळगाव वाडी,दहिटणे वाडी, कोंन्हाळी, चप्‍पळगाव, बोरोगाव, डोंबर जवळगे, बऱ्हाणपूर, अक्कलकोट, नागणहळळी,  उंमरगे, मिरजगी, मैंदर्गी, नागोरे, मुगळी, संगोगी,  दुधनी

3- दक्षिण सोलापूर-उळे, कासेगाव, बोरामणी, तांदुळवाडी, संगदरी, मुस्ती, दर्गनहळळी, धोत्री, तीर्थ, कुंभारी, यत्नाळ, फताटेवाडी, होटगी, हत्तुर, घोडा तांडा, मद्रे

4- उत्तर सोलापूर- तरटगाव,मार्डी,बानेगाव,कारंबा,  गुळवंची, खेड, शिवाजीनगर तसेच केगाव

( संदर्भ स्त्रोत - लोकमत)

English Summary: land acquire process start for chennai greenfield corridor in solapur district Published on: 09 April 2022, 08:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters