1. यांत्रिकीकरण

आता कांदा काढणी मशील ठरतेय फायदेशीर, शाहू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची कमाल

सध्या देशात मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतकऱ्यांचे यामुळे शारीरिक कष्ट कमी झाले आहे. असे असताना आता येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या कांदा काढणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना चांगला कायदा होत आहे.

onion harvesting becoming profitable

onion harvesting becoming profitable

सध्या देशात मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतकऱ्यांचे यामुळे शारीरिक कष्ट कमी झाले आहे. असे असताना आता येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या कांदा काढणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना चांगला कायदा होत आहे.

आता यंत्राला (Onion harvester) 'टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फोरम फॉर ॲग्रिकल्चर नर्चरिंग' (तिफन २०२२) या राष्ट्रीय स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळाला. यामुळे भविष्यात हे यंत्र अनेकांना फायदेशीर ठरणार आहे. जॉन डिअर इंडिया प्रा. लि. आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर (National Level)आयोजित केली जाते.

यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी येत असतात. या स्पर्धेत कृषी संबंधित वेगवेगळी कामे कमीत कमी मनुष्यबळ वापरून सुलभरीत्या करण्यासाठी विविध उपकरणे तयार करून त्याचे प्रात्यक्षिक सादर करावे लागते. यामुळे याचा अनेकांना फायदा होतो. हे बघण्यासाठी देखील अनेक शेतकरी येत असतात. या वर्षी कांदा काढणी यंत्र (Onion harvester) हा विषय होता.

सरकारचे हे कार्ड शेतकऱ्यांचे उत्पन्न करणार दुप्पट, शेतकऱ्यांनो जाणून घ्या सर्व माहिती

यामध्ये देशभरातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भाग घेतला. कांचनवाडीमधील छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले कांदा काढणी यंत्र दोन तासात एक एकरपेक्षा अधिक कांदा काढणी कमी इंधनामध्ये करू शकते. या यंत्राने पहिल्या फेरीत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता.

राज्यात वाढणार नवीन सहकारी कारखाने? कारखान्यांना परवानगी देण्याची मागणी

यामुळे येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. दरम्यान, अंतिम फेरीत त्यांना तिसरा क्रमांक मिळाला असून, रोख ७५ हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. यामुळे या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. या टीममध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

महत्वाच्या बातम्या;
एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी 5 कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश
बिग ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, भाजप आता राष्ट्रवादी फोडणार..
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, पदाची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाल्या द्रौपदी मुर्मू, जाणून घ्या..

English Summary: onion harvesting becoming profitable, Shahu engineering students maximum Published on: 25 July 2022, 05:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters