1. बातम्या

अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते : उद्धव ठाकरे

संकटे येतात जातात, मात्र शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय माता भगिनी तळ हातावरील फोडाप्रमाणे शेती पिकवतात. मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतं असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते : उद्धव ठाकरे

अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते : उद्धव ठाकरे

कृषी क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज नाशिकमध्ये सन्मान झाला. नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते असे मुख्यमंत्री म्हणाले. मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी दिसते असेही ते म्हणाले.

आपले सरकार बेशरम नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी संकटाच्या काळातही वेगवेगळे प्रयोग करत असतात. नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलत होते.

आनंदाची बातमी : आमिर खान यांनी 'सत्यमेव जयते फार्मर कप' ची केली घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

निवडणूकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी घोषणा करणारं आपलं सरकार नाही

संकटे येतात जातात, मात्र शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय माता भगिनी तळ हातावरील फोडाप्रमाणे शेती पिकवतात. मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतं असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. शेतकऱ्यांना हमीभाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी घोषणा करणारं आपलं सरकार नाही. आपले सरकार हे बेशरम नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, अन्न दाता सुखी असेल तर देशही सुखी राहतो. आपल्या कृषीप्रधान देशाचे सर्व शेतकरी हे वैभव आहेत. शेतकरऱ्यांचे श्रमाचे मोल करणारे सरकार आहे, ही भावना निर्माण झाली पाहिजे.

आम्ही वर्क फ्रॉम होम करतो, पण शेतकऱ्यांना ते शक्य नाही. संकटे येतात जातात, मात्र शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय माता भगिनी तळ हातावरील फोडाप्रमाणे शेती पिकवतात असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून खंताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आता बियाणे आणि खते (Seeds and fertilizers) केंद्र सरकारकडून मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिली. केंद्र सरकारकडून (Central Government) राज्यासाठी 45 लाख मेट्रिक टन खत मिळणार आहे, त्याला केंद्र सरकारने तत्वता मान्यता दिली असल्याचे भुसे म्हणाले.

माती परीक्षण काळाची गरज...

कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, यावर्षी कोणालाही बियाणे, रासायनिक खते कमी पडणार नाहीत. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीचे काम सुरु होते. शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टामुळे कोणालाही अन्नधान्य कमी पडले नाही. कोणालाही फळे, दूध, अन्नधान्या कमी पडले नसल्याचे दादाजी भुसे म्हणाले. कृषी योजनांचा 50 टक्के लाभ महिलांना मिळणार आहे. लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांचे नाव सातबाऱ्यावर लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाची, राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांनी सावरली आहे. शेतकऱ्यांच्या पोरांना कस पिकवायचे हे सांगणे गरजेचे नाही, पण पिकवलेला माल कसा विकायचा हे सांगण्याचे काम कृषी विभाग करणार असल्याचे भुसे म्हणाले. कृषी क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज नाशिकमध्ये सन्मान झाला.

नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात दादाजी भुसे बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

Jackfruit : फणस प्रक्रिया आणि आरोग्यदायी फायदे

English Summary: Ajit dada, you are a farmer, you know agriculture very well : Uddhav Thackeray Published on: 02 May 2022, 04:59 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters