1. बातम्या

महाकाळा येथे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट उपकेंद्र सुरू; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार उसाचे बेणे आणि तांत्रिक प्रशिक्षण

सध्या मराठवाड्यात उसाचे लागवड क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून या पार्श्वभूमीवर महाकाळा येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
vasantdada suger istitute subcenter start at mahakaala that give training to farmer

vasantdada suger istitute subcenter start at mahakaala that give training to farmer

सध्या मराठवाड्यात उसाचे लागवड क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून या पार्श्वभूमीवर महाकाळा येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे.

या उपकेंद्राच्या माध्यमातून उसाचे अधिक उत्पादन देणारे दर्जेदार बेणे तयार केले जाणार असून  या बेण्याची लागवड शेतकऱ्यांनी करावी. एवढेच नाही तर  साखर कारखान्यांना तांत्रिक दृष्ट्या कुशल तरुण उपलब्ध व्हावेत यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देखील तरुणांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

नक्की वाचा:कृषीकर्ज थकबाकी चिंतेचा विषय! राज्य सरकारांनी वसुलीसाठी कायदा करावा- इंडियन बँकिंग असोसिएशन

या उपकेंद्राच्या माध्यमातून तरुणांना नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.अंकुश नगर तालुका अंबड या ठिकाणी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या साठ हजार लिटर प्रतिदिनक्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी शरद पवार बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील होते व त्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन चे अध्यक्ष बी बी ठोंबरे, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाणत्यासोबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना पवार यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला कि, उसाची लागवड अवश्य करावी. मात्र ती लागवड करतानाकिती प्रमाणात करावी जेणेकरून भविष्यात  त्रास होणार नाही, याची देखील काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. 

मराठवाड्यामध्ये अगोदर जास्त प्रमाणात कापूस लावला जात होता परंतु या वर्षी कापसाला 14 हजार रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळत आहे. जर दहा एकर जमीन असेल तर 1 ते 2 एकर कापूस लावा  तसेच त्यासोबत सोयाबीन, विविध फळबागा तसेच इतर पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे मार्ग तयार करा असेही त्यांनी म्हटले.

English Summary: vasantdada suger istitute subcenter start at mahakaala that give training to farmer Published on: 17 April 2022, 01:18 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters