1. बातम्या

चढ्या दराने खत विक्री केली तर कृषि केंद्राचा परवाना होणार रद्द, शेतकऱ्यांनो 'या' नंबरवर करा थेट तक्रार

सध्या खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. यामध्ये बाजारपेठत (Chemical Fertilizer) रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई असल्याचे भासवत (Fertilizer Rate) चढ्या दराने विक्री केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पावसाच्या तोंडावर सध्या हे प्रकार वाढले आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
fertilizer sold higher rate

fertilizer sold higher rate

सध्या पावसाळा सुरु झाला असून शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगबग सुरु आहे. असे असताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सध्या खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. यामध्ये बाजारपेठत (Chemical Fertilizer) रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई असल्याचे भासवत (Fertilizer Rate) चढ्या दराने विक्री केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पावसाच्या तोंडावर सध्या हे प्रकार वाढले आहेत.

सध्या अधिकच्या दराने विक्री, लिंकिंग पध्दती आणि कृत्रिम टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. याबबतीत तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना थेट तालुका कृषी कार्यालयात यावे लागत होते. आता मात्र जिल्हा कृषी कार्यालयाच्या माध्यमातून अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. विक्रेत्याकडून एमआरपी पेक्षा अधिक दराने खताची विक्री केली जात असली तर एका फोनवर शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेतली जाणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या एका फोनवर कृषि सेवा केंद्राचा परवाना देखील रद्द होणार आहे .(Agricultural Department) कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे खत विक्रीतील अनियमिततेला आळा बसणार आहे. यामुळे खत विक्रेता जर निश्चित दरापेक्षा अधिकच्या दराने खताची विक्री करीत असेल तर शेतकऱ्यांना नियंत्रण कक्षातील 9823915234 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. यामुळे संबंधित कृषी केंद्रावर कारवाई केली जाणार आहे.

'५० हजारच्या प्रोत्साहन अनुदानासाठी जाचक अटी, सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक'

तसेच खताचे नाव, एमआरपी, खत खरेदीची पावती याची माहिती फोनद्वारे द्यावी लागणार आहे. यावरुन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे तर नोंद होणारच आहे पण कारवाईच्या अनुशंगाने सोईस्कर व्हावे म्हणून तालुका कृषी कार्यालयालाही माहिती दिली जाणार आहे. तसेच शेतकरी मेल करुनही तक्रार नोंदवता येणार आहे. याकरिता dsaojalna@gmail.com किंवा adozpjalna@gmail.com या मेल आयडीवरही तक्रार नोंदवता येणार आहे. यामुळे या गोष्टी कमी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी
महाराष्ट्रातील तरुणाने भरला राष्ट्रपती पदासाठी अर्ज, चर्चांना उधाण...
आसाममध्ये पुराचा हाहाकार! 50 लाख लोक बाधित, मंत्री मात्र ठेवत आहेत बंडखोर आमदारांवर लक्ष

English Summary: fertilizer sold higher rate, license agricultural center revoked. Farmers s complaint this number Published on: 28 June 2022, 12:36 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters