1. बातम्या

आधी मजूरटंचाई आता खतांची टंचाई; कसमादे परिसरासमवेत जिल्ह्यातील शेतकरी हतबल, मात्र……

राज्यातील शेतकऱ्यांना गतवर्षी अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते त्यापैकी एक होते मजुरांची टंचाई. नाशिक जिल्ह्यात देखील गतवर्षी मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत होती नववर्षाच्या सुरुवातीपर्यंत मजूरटंचाई ही कायमच होती. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थातच कसमादे परिसरात मजुरांची टंचाई ही भयान जाणवत होती. रब्बी हंगामातील रांगडा कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असतानाच झालेली मजूर टंचाई शेतकर्‍यांसाठी एक डोकेदुखीच बनली होती, यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांना अधिकची मजुरी देऊन अक्षरशहा रात्रीदेखील कांदा लागवड करून कशीबशी रब्बी हंगामातील रांगडा कांदा लागवड केली.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
fertilizer shortage in baglan

आता रब्बी हंगामातील पिके वाढीसाठी सज्ज आहेत आणि पिकांना जोमाने वाढण्यासाठी सर्वात जास्त आवश्यकता असते ती खतांची. रब्बी हंगामातील पिकांना देखील आता खताची नितांत आवश्यकता आहे, मात्र ऐन रबी हंगामातील पिकांच्या जोमदार वाढीच्यावेळीच कसमादे परिसरात विशेषता बागलानच्या खोऱ्यात खतांची टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला जाण्याची वेळ आली आहेत. आधीच अनेक संकटांचा सामना करत बळीराजा कसाबसा  रब्बी हंगाम आकडे वाढला आहे व यातून त्याला भरघोस उत्पादनाची आशा आहे मात्र असे असतानाच खत टंचाई येथील शेतकऱ्यांची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. शेतकरी बांधवाना रासायनिक खतांच्या शोधात वेगवेगळ्या दुकानाच्या वाऱ्या करण्याची नामुष्की ओढवून आली आहे.

सध्या बाजारात 10:26:26, 18:46:46, 12:32:16 या खतांची टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे. शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील पिकांसाठी याचं खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असते. शेतकरी बांधव या खतांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात पायपीट करताना दिसत आहेत, मात्र शेतकरी राजांना खत काही मिळत नाही. परिसरात निर्माण झालेल्या या खत टंचाईमुळे शेतकरी बांधव पुरता हवालदिल झाला आहे, जर अशीच परिस्थिती अजून काही दिवस कायम राहिले तर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडालाच निर्माण झालेली ही खत टंचाई शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभी करती झाली आहे. हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेली खत टंचाई खरीखुरी खत टंचाई आहे की कृत्रिम रीत्या खत टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा एक सुनियोजित कार्यक्रम आहे यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मनात विचारांचे काहूर माजलेले आहे. मात्र आम्ही आपणास सांगू इच्छितो की, खत टंचाई बाबत एमसीडीसी कडे विचारपूस केली असता खत टंचाई खरंच निर्माण झाली आहे हे निदर्शनात आले असून अजून किमान आठवडाभर खत उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

परिसरातील शेतकऱ्यांच्या मते, राज्याचे कृषिमंत्री व मालेगाव बाह्यचे यशस्वी आमदार माननीय दादाजी भुसे साहेबांकडे खत टंचाई ची समस्या मांडण्यात आली असून त्याबाबत एक निवेदन देखील साहेबांना देण्यात आले आहे. मात्र असे असले तरी अद्यापही खत टंचाईची समस्या निकाली काढण्यात शासन अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना आगामी काही दिवसात खत टंचाईची समस्या दूर होईल अशी आशा आहे.

English Summary: nashik district farmers facing fertilizer crisis Published on: 16 January 2022, 01:19 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters