अमरावती : शेती हेच शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन आहे. कृषी क्षेत्रात शेतकरी बंधूंना अनेक अडचणीच्या डोंगरांना पार करावे लागत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्व असले तरी सध्या बळीराजावर एका मागून एक संकटांची मालिका सुरूच आहे. दरम्यान इंधन दरवाढीमुळे मशागतींसह पेरणीचा खर्च वाढला होता. त्यात आता भर म्हणून पाच वर्षात बियाणे व खतांमध्ये दुप्पट दर वाढ झाली आहे.
ही दरवाढ आतापर्यंतची दुप्पट दरवाढ असल्याचं सांगितले जात आहे. दिवसेंदिवस शेतीचा वाढत उत्पादन खर्च पाहून शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.अमरावती विभागात कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. यामध्ये साधारण सोयाबीनचे १४.५९ लाख आणि कपाशीचे १०.७५ लाख हेक्टर एवढे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात आता सोयाबीन आणि कपाशीचा उच्चांकी भाव लक्षात घेतला तर, किमान ५० हजार हेक्टरमध्ये सोयाबीन आणि कपाशी पिकांची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा हाहाकार; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; रस्त्यावरील गाड्याही गेल्या वाहून
सोयाबीन बियाणे यंदा ३,२०० ते ३,५०० रुपयांवर
यंदा पावसाची गती मंदावली आहे. अजून पाच ते सहा दिवस पाऊस येण्याची शक्यता नाही. मात्र कंपन्यांनी हंगामापूर्वीच बियाणे आणि खतांच्या दरात वाढ केली. सोयाबीन बियाणे यंदा ३,२०० ते ३,५०० रुपयांवर पोहचले आहेत. पाच वर्षांपूर्वी १,७०० रुपये प्रतिबॅग असणारे सोयाबीन बियाणांनी यंदा उच्चांकी दर गाठला आहे. मागीलवर्षी कापसाचे ४५० ग्रॅमचे 'बीजी-२'चे पाकीट हे ७६७ रुपयांना होते, आत तेच पाकीट ८१० रुपयांवर पोहोचले आहे. युरिया वगळता सर्वच रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Happy Father's Day : बाप बाप असतो, त्याच्या पेक्षा मोठा देव पण नसतो..!!
'एक दिवस बळीराजासोबत'
Share your comments