1. बातम्या

'एक दिवस बळीराजासोबत'

राज्यात मान्सूनमुळे शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. अशातच बियाणांबाबत कुंभा परिसरात शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला उपक्रम राबवण्यात आला. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
'एक दिवस बळीराजासोबत'

'एक दिवस बळीराजासोबत'

Maregaon: राज्यात मान्सूनमुळे शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. अशातच बियाणांबाबत कुंभा परिसरात शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला उपक्रम राबवण्यात आला. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. शेती तसेच शेती संबंधित व्यवसाय यांचे अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळे सरकार नेहमीच शेती व्यवसायात अधिकाधिक वृद्धी व्हावी यासाठी प्रयत्नशील असते.

कुंभा परिसरात राबवण्यात आलेल्या 'एक दिवस बळीराजासोबत' या उपक्रमाची राज्यभरात चर्चा होत आहे. महसूल विभागातर्फे 'एक दिवस बळीराजासोबत' या बियाणे वाटप seeds Distribution या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे कुटुंब अनेक समस्यांना सामोरे जात असते.

त्यांच्यासाठी अधिकाधिक योजना आखल्या जाव्या व त्यांना सुरळीत जीवन जगता यावे यासाठी योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 'एक दिवस बळीराजासोबत' यामार्फत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच टाकळी, कुंभा या गावातील शेतकर्‍यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांचे वाटप करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले...

80 हजार 800 रुपयांचे बियाणे वाटप
या योजनेसाठी 13 शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना नेमण्यात आले होते. या 13 शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना एकूण 86 पाकिटांचे वाटप करण्यात आले. कपाशी बियाणे, सोयाबिन बियाणांचे 7 पाकिट शिवाय तुरीचे 43 पाकिटांचे वाटप करण्यात आले. या बियाण्यांची किंमत 80 हजार 800 रुपये इतकी आहे. याचे वाटप
कुंभा 1 चे तलाठी वानखेडे, कुंभा 2 चे तलाठी थिटे, टाकळी येथील सरपंच प्रेमिला आदेवार, पोलिस पाटील संगीता राजू आदेवार आणि कोतवाल उत्तम आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या खास कार्यक्रमात लाभार्थी तसेच गावातील नागरिक यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या:
आता बोगस मतदार ओळखपत्रांचा होणार पर्दाफाश; निवडणूक प्रक्रियेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातून खताची तस्करी करणा-यांचा पर्दाफाश; ट्रक चालक अटकेत

English Summary: 'One day with farmers' Published on: 19 June 2022, 11:19 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters