1. बातम्या

अरे पावसा आता तरी पड! पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, पावसाअभावी बादलीने पिकाला पाणी देण्याची ओढवली वेळ

यंदा पाऊस लांबणीवर गेला असल्याने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे. रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यातील अनेक भागात ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
हे चित्र शेतकऱ्यांची सध्यपरिस्थिती दर्शवत आहे.

हे चित्र शेतकऱ्यांची सध्यपरिस्थिती दर्शवत आहे.

यंदा पाऊस लांबणीवर गेला असल्याने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे. रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यातील अनेक भागात ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता. मात्र पाऊस लांबणीवर गेल्याचं चित्र दिसत आहे. शेतकरी वर्गाने तर पाऊस वेळेत पडेल या आशेवर खरिपाची सर्व तयारीदेखील केली.

येवला तालुक्यातील पारेगाव येथील एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची पीक वाचवण्याची धडपड चालू आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने टोमॅटो पीक धोक्यात येऊ शकते म्हणून शेतकरी राजू सय्यद यांनी मग, बादली, तांब्याने पिकाला पाणी दिले. हे चित्र शेतकऱ्यांची सध्यपरिस्थिती दर्शवत आहे. काही भागात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची मेहनत पाण्यात गेली आहे. तर काही भागात पाऊस न बरसल्याने पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे शेतकरी या निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळला आहे. शेतकरी राजू सय्यद हे येवला तालुक्यातील पारेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी जवळजवळ पाऊण एकरमध्ये टोमॅटोचे पीक घेतले आहे. तालुक्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र पाऊस वेळेत न पडल्याने त्यांना पिकाच्या नुकसानीची काळजी वाटू लागली. आणि शेवटी त्यांनी पीक वाचवण्यासाठी तांब्याने आणि बादलीने पाणी घालण्याचा निर्णय घेतला.

'एक दिवस बळीराजासोबत'

शेतकरी राजू सय्यद यांना टोमॅटो पीक लागवडीकरिता 40 ते 45 हजार रुपये इतका खर्च आला आहे. जर लवकर पाऊस नाही पडला तर श्रमिक खर्च तर वाया जाईलच सोबतच आर्थिक फटका बसेल तो वेगळाच. कित्येक महिन्यांची मेहनत वाया जाऊ नये यासाठी शेतकरी इकडून तिकडून पाणी आणून पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या पावसाअभावी शेतकऱ्यांची बरीच तारांबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या:
साहेब शेती परवडत नाही; पठ्ठ्याने 'फाईव्ह स्टार हॉटेल'साठी केली कोट्यावधींच्या कर्जाची मागणी
मनसे पदाधिकार्‍यांचे अनोखे आंदोलन; शेणखताची बॅग देऊन...

English Summary: Farmers struggle to save their crops Published on: 19 June 2022, 02:17 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters