1. बातम्या

मोठी बातमी! गहू निर्यात बंदीबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळे जगभरातून भारतावर गहू निर्यात बंदी हटवण्यासाठी दबाव आणला जात आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बरेच नुकसान झाले आहे. चार महिने उलटूनदेखील युद्धबंदीची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा हा बंदरांवर अडकला.

मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा हा बंदरांवर अडकला.

wheat exports: भारत सरकार 1.2 दशलक्ष टन गव्हाची निर्यात करण्यास मंजुरी देऊ शकते. भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळे जगभरातून भारतावर गहू निर्यात बंदी हटवण्यासाठी दबाव आणला जात आहे.  रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बरेच नुकसान झाले आहे. चार महिने उलटूनदेखील युद्धबंदीची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही.  शिवाय अचानक केलेल्या गहू निर्यात बंदीमुळे मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा हा बंदरांवर अडकला. 

बंदरांवर जमा झालेला गहू निर्यात करण्यासाठी भारत सरकार आता 1.2 दशलक्ष टन इतका गहू विदेशात पाठवण्याची परवानगी देऊ शकते. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतासह अनेक देशांना झळ बसत असून सध्या जगभरात गव्हाच्या टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जगभरात गव्हाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. जिथून गहू मिळेल तिथून खरेदी करण्यावर भर दिला जात आहे.

माध्यमांनुसार, बंदरांवरील 1.2 दशलक्ष टन गव्हाची निर्यात केली तरी सुमारे 500,000 टन गहू बंदरांमध्ये शिल्लक राहू शकतो. त्यामुळे निर्यात झाली तरी बंदरांवरील भार हलका होणार नाही. भारत सरकारने गहू निर्यातबंदी केल्यानंतरसुद्धा 469,202 टन गहू पाठवण्यास मंजुरी दिली आहे. अजूनही किमान 1.7 मिलियन टन गहू बंदरांवर शिल्लक आहे. काही व्यापाऱ्यांना तर निर्यातीचे परवानेदेखील मिळू शकलेले नाहीत. बंदरांवर शिल्लक असलेल्या गव्हाचे मान्सूनच्या पावसामुळे नुकसान होऊ शकते. आणि जर पाऊस झाला तर गव्हाचा दर्जादेखील कमी होण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, लेटर ऑफ क्रेडिट (LC) असलेल्या व्यापाऱ्यांनाच भारत सरकार गहू निर्यातीची मंजुरी देईल. बांगलादेश, श्रीलंका व नेपाळ सारखे देश भारतीय गव्हावर अवलंबून आहेत. या मंजुरीमुळे या देशांमध्ये गव्हाचा तुटवडा भरून निघण्यास मदत होईल. निर्यातबंदीमुळे नेपाळ, इंडोनेशिया, फिलिपाइन्स व श्रीलंका येथे जाणाऱ्या गव्हाची निर्यात थांबली आहे. गव्हाचा मोठा साठा आता बांगलादेशात जाणार आहे असं एका व्यापाऱ्याने सांगितले.

खरीपातील चारा पिकाचे लागवड तंत्र

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर बराच परिणाम झालेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात युरोपियन संघात गव्हाची किंमत जवळपास 43 रुपये प्रति किलो असून भारतीय गहू 26 रुपये किलो दराने विकला जातोय. पाहायला गेलं तर दोन्हीमध्ये 17 रुपये किलोचा फरक दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारताने मागीलवर्षी पेक्षा यंदा पाचपट अधिक गव्हाची निर्यात केली आहे. भारताने एप्रिल 2022 मध्ये 14.5 लाख टन गहू निर्यात केला आहे.


महत्वाच्या बातम्या:
Maruti Suzuki Ertiga: अल्टोच्या किंमतीत खरेदी करा एर्टिगा, फायनान्स पण उपलब्ध; वाचा सविस्तर 
मोठी बातमी! जगातून कॅन्सर होणार गायब! कॅन्सरवर औषध सापडले, ट्रायलमध्ये कॅन्सर रुग्ण पूर्णपणे रोगमुक्त 

English Summary: Big news! The central government will take a big decision regarding the ban on wheat exports Published on: 09 June 2022, 10:11 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters