1. कृषीपीडिया

या आहेत गव्हाच्या पाच उन्नत जाती, एक हेक्टर मध्ये मिळू शकते भरपूर उत्पादन

गहू हे रबी हंगामातील प्रमुख पीक आहे.दुसऱ्या पिकासारखे जर गव्हाच्या प्रगत आणि विकसित जातींचा वापर केला तर शेतकऱ्यांना गव्हाचे उत्पादन जास्त मिळून सोबत नफाहीवाढू शकतो.शेतकरी या जातींची निवड योग्य वेळ लक्षात घेऊन आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करून करू शकतो. या लेखात आपण गव्हाच्या नवीन पाच उच्चतम जातींविषयी माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
wheat crop

wheat crop

 गहू हे रबी हंगामातील प्रमुख पीक आहे.दुसऱ्या पिकासारखे जर गव्हाच्या प्रगत आणि विकसित जातींचा वापर केला तर शेतकऱ्यांना गव्हाचे उत्पादन जास्त मिळून सोबत नफाहीवाढू शकतो.शेतकरी या जातींची निवड योग्य वेळ  लक्षात घेऊन आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करून करू शकतो. या लेखात आपण गव्हाच्या नवीन पाच उच्चतम जातींविषयी माहिती घेणार आहोत.

 गव्हाच्या दर्जेदार नवीन जाती

  • करणनरेंद्र– ही जात गव्हाच्या नवीन जाती मधील एक जात आहे. या जातीला डीबीडब्ल्यू 222सुद्धा म्हटले जाते.गव्हाचे ही जात बाजारात 2019 मध्ये आली होती. या जातीची लागवड 25 ऑक्‍टोबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान करणे महत्त्वाचे आहे. या जातीपासून बनलेली चपाती ची गुणवत्ता फार चांगली मानली जाते. चार वेळा पाणी दिल्यानंतर या जातीचे गव्हाचे उत्पादन चांगले होऊ शकते. या जातीचा गहू 143 दिवसांमध्ये कापणीला येतो यापासून प्रति हेक्टर 65.1 ते 82.1क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
  • करण वंदना- या जातीला डीबीडब्ल्यू 187 सुद्धा म्हटले जाते.  गव्हाची ही जात गंगेच्या किनारी प्रदेशातचांगले उत्पादन देते.गव्हाची ही जात 120 दिवसांमध्ये तयार होते.या जातीपासून प्रति हेक्‍टर जवळजवळ 75 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
  • पुसा यशस्वी-गव्हाची ही जात कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ते राज्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. ही जात रसशोषक किडींना आणि तांबेरा रोगाला प्रतिरोधक मानले जाते. 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा काळ या जातीच्या लागवडीसाठी योग्य मानला जातो. या जातीपासून प्रति हेक्टर 57 ते 79 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
  • करण श्रिया- गव्हाची ही जात जून 2021 मध्ये बाजारात आली होती. या जातीची शिफारस उत्तर प्रदेश,बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यासाठी केली गेली आहे. जवळजवळ 127 दिवसांमध्ये ही जात कापणी  योग्य होते. एका हेक्टरी मध्ये जवळजवळ 55 क्विंटलपर्यंत उत्पादन येऊ शकते.

 

  • डीडीडब्ल्यू 47 – गव्हाच्या या जाती मध्ये प्रोटीन चे मात्र सगळ्यात जास्त असते. या गव्हाच्या  जातीचा रोपांमध्ये बऱ्याच रोगांविरोधात लढण्याची ताकद आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात कीटक आणि रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यास सक्षम आहे. या जातीपासून प्रति हेक्‍टरी 74 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.

 

English Summary: the beneficial species of wheat crop Published on: 06 September 2021, 10:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters