मागच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना सोयाबीनला दिलासादायक दर मिळत होता. मात्र आता सोयाबीन दराची स्थिती ढासळली असल्याने पुन्हा शेतकऱ्यांमध्ये निराशा झाली आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी सोयाबिनला (Soybean Market Price) कमाल ६-७ हजार रुपयांचा दर मिळत होता. मात्र काल सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील सोयाबीन बाजारभावानुसार सोयाबीनचे कमाल दर ४५०० पर्यंत येऊन ठेपले आहेत.
काल लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक कमाल भाव 5 हजार 425 इतका भाव मिळाला आहे. तसेच याठिकाणी 3340 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे. यासाठी किमान भाव 5 हजार, तर कमाल भाव ५ हजार ४२५ आणि सर्वसाधारण भाव 5 हजार 380 रुपये मिळाला आहे.
शेतकऱ्यांनो तारणकर्ज योजनेचा लाभ घेऊन चांगल्या दराने धान्य विक्री करा; जाणून घ्या प्रक्रिया
आपण पाहिले तर इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार च्या दरम्यान कमाल भाव सोयाबीनला (Soybean Market Price) मिळत आहे. तर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल दर 4 हजार 500, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 हजार 500, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 हजार 814, दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 हजार 700 रुपये असे भाव प्रतिक्विंटलसाठी मिळाले आहेत.
२४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी राजयोग: 'या' ५ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेचे मिळणार वरदान
त्यामुळे शेतकऱ्यांनी आज सोयाबीन विक्री करण्यास घेऊन जाताना बाजारभाव तपासून जावे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या दोन दिवसात सोयाबीन दर बराच उतरला असल्याचे दिसत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीवर भर दिला तर फायदेशीर ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या
आता लवकरच शेतकऱ्यांना जांभळ्या टोमॅटोची लागवड करता येणार; टोमॅटोची नवीन जात विकसित
रात्री शांत झोप लागत नसेल तर एकदा 'हा' झोपेचा चहा प्या; मिळेल आरामदायक फायदा
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवा आणि व्हा 25 लाखांचे मालक; जीवन आनंद योजना देतेय संधी
Share your comments