मालेगाव : रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात काही भागात ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता.असं असलं तरी पाऊस लांबणीवर गेल्याचं चित्र दिसत आहे. मात्र काही भागात उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाने असं काही आक्रमक रूप धारण केले आहे की, यात सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे.
सध्या बाजारात कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यात आता पावसानेही शेतकऱ्यांची साथ सोडली आहे. कांदा अधिक काळ टिकावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची कांदा चाळीत साठवणूक केली. मात्र एवढी धडपड करूनही पावसाने पाणी फेरले आहे. मुंजवाडचे भास्कर सोनवणे यांचे पावसामुळे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
मुसळधार पडणाऱ्या पावसाने चाळीत साठवलेल्या तब्बल 50 क्विंटल कांद्याचे नुकसान केले आहे. पाऊस इतका जोरात होता की, कांदा वाहत थेट सटाणा शहारत घुसला. आधीच दरात घसरण त्यात कांदाही पाण्यात वाहून गेला. शेतकऱ्याची दुष्काळात तेरावा महिना अशीच गत झाली आहे.
तब्बल 12 ट्रॅक्टर कांद्याचे झाले नुकसान
कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत आहे. तर कधी कांद्याचे जिल्हानिहाय कांद्याचे दर ठरवून गैरप्रकार चालू झाले आहेत. यात मात्र कांदा उत्पादक शेतकरी भरडला जातोय. म्हणून बरेच शेतकरी कांद्याची साठवणूक करून दर वाढीची प्रतीक्षा करत आहेत. त्याचप्रमाणे सोनवणे यांनी 12 ट्रॅक्टर कांद्याची साठवणूक केली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामध्ये क्षणाधार्थ चित्रच बदलले. पावसाने कांदा थेट रस्त्यावरच आणला.
मोदी सरकारचा हरभरा उत्पादकांना मोठा धक्का; पुन्हा एकदा खरेदीवर बंदी,शेतकरी आर्थिक अडचणीत
अपेक्षांवर पाणी
गेले चार महिने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 3 ते 4 रुपये किलो दर मिळत आहे मात्र पावसाळ्यात दर वाढण्यास सुरुवात झाली होती. साठवलेल्या कांद्यातून आता चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी सोनावणे यांची होती. मात्र त्यांच्या पावसामुळे त्यांचा उद्देश साध्य झाला नाही.
महत्वाच्या बातम्या:
एकीकडे आमदार फरार मात्र हा आमदार थेट पेरणीच्या औतावर, फोटो व्हायरल
बफर स्टॉक राखण्यासाठी नाफेडमार्फत केंद्र सरकारची 52,460 टन कांदा खरेदी
Share your comments