केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधील एक योजना म्हणजे पीएम किसान योजना.
शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकरी 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी त्यांच्या अर्जाची स्थिती घरी बसून फोन कॉलद्वारे मिळवू शकतात? पण कशी याविषयी आज आपण जाणून घेऊया...
रात्री शांत झोप लागत नसेल तर एकदा 'हा' झोपेचा चहा प्या; मिळेल आरामदायक फायदा
१५५२६१ या क्रमांकावर कॉल करून अर्जाची स्थिती तपासा
सर्वात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी देशभरातील छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी शेतकरी बांधवांना पीएम किसानच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
मग यानंतर शेतकरी १५५२६१ या क्रमांकावर कॉल करून अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात. याद्वारे शेतकरी त्यांच्या अर्जाच्या स्थितीची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. योजनेतील अर्ज प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी सरकारने हा पुढाकार घेतला आहे.
आता लवकरच शेतकऱ्यांना जांभळ्या टोमॅटोची लागवड करता येणार; टोमॅटोची नवीन जात विकसित
12 वा हप्ता पाठवण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2019 मध्ये पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. ही योजना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपये मिळतात.आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. माहितीनुसार 12 वा हप्ता पाठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांना शेती यंत्रे खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ
रब्बी हंगामात आंतरपीक पद्धतीने करा शेती; मिळेल दुप्पट फायदा
सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; किती मिळतोय सोयबिनला बाजारभाव? जाणून घ्या
Share your comments