1. कृषी व्यवसाय

Agricultural Business: रब्बी हंगामात आंतरपीक पद्धतीने करा शेती; मिळेल दुप्पट फायदा

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Rabi season

Rabi season

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके (crops) घेऊन चांगले उत्पन्न घेत असतात. आंतरपीक पद्धतीने शेतकरी दुहेरी नफा मिळवू शकतात. त्यामुळे कोणत्या पिकांमध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी? याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया...

शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, सतत एकच पीक घेतले तर पिकांचे हवे तसे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे कधीही फेरबदल करून पिके घ्यावी. रब्बी हंगामात (Rabi season) सलग पिकाच्या ऐवजी आंतरपीक पीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.

तसेच हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. माहितीनुसार रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी + हरभरा ६:३ आणि रब्बी ज्वारी + करडई ६:३ या आंतरपीक पद्धती अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या असल्याचे म्हंटले आहे.

२४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी राजयोग: 'या' ५ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेचे मिळणार वरदान

फायदेशीर आंतरपीक पद्धती कोणत्या आहेत?

१) रब्बी ज्वारी + करडई

ज्या ठिकाणी ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, अशा ठिकाणी या पीक पद्धतीचा वापर करण्यास सांगितले आहे. ज्वारी अथवा करडई च्या सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात वाढ होते. ही आंतरपीक पद्धत ६:३ या ओळीच्या तासाच्या प्रमाणात घ्यावी.

२) करडई + हरभरा

महत्वाचे म्हणजे मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची (Intercropping) शिफारस करण्यात आलेली आहे. ४:२ अथवा ६:३ ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धत घेतल्यास शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो.

दिवसाला फक्त 45 रुपये वाचवा आणि व्हा 25 लाखांचे मालक; जीवन आनंद योजना देतेय संधी

दुबार पीक पद्धती

विशेष म्हणजे ज्या जमिनीची खोली एक मीटर अथवा त्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीवर दुबारपीक पद्धत यशस्वीरित्या घेता येते. अशा जमिनीमध्ये दुबार पीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे.

1) खरीप मूग / उडीद / सोयाबीन - रब्बी ज्वारी / हरभरा / करडई
2) खरीप संकरित ज्वारी - करडई / हरभरा / जवस, या पिकांची दुबार पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 
सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; किती मिळतोय सोयबिनला बाजारभाव? जाणून घ्या
आता लवकरच शेतकऱ्यांना जांभळ्या टोमॅटोची लागवड करता येणार; टोमॅटोची नवीन जात विकसित
रात्री शांत झोप लागत नसेल तर एकदा 'हा' झोपेचा चहा प्या; मिळेल आरामदायक फायदा

 

English Summary: Agricultural Business Intercropping Rabi season double benefit Published on: 20 September 2022, 12:59 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters