सध्या शेतीमध्ये यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. जर आपण शेती क्षेत्राचा विचार केला तर अगदीच जमिनीची पूर्वतयारी असो की पिकांची काढणी यासाठी विविध प्रकारची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत व शेतकरी आता अशी यंत्रे वापरू लागले आहेत.यंत्राच्या
वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ तर वाचतोच परंतु कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्तीचे काम देखील होते व हे काम वेळेत होते.
तसेच नेमके पीक काढणीच्या वेळेसच मजुरांची टंचाई मोठ्याप्रमाणात भासते.त्यामुळे बऱ्याचदा पिक काढण्याचे काम वेळेवर होत नाही.अशा या सगळ्या समस्यांवर यंत्रांचा वापर हा एक चांगला उपाय आहे.पिकांच्या कापणीसाठी शेतकरी विविध प्रकारची यंत्रे सध्या वापरू लागले आहेत.
त्यांच्या कापण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते व सध्या मजूरटंचाई हा शेतीसमोरील एक बिकट प्रश्न आहे. परंतु आता एक कापण्याची चिंता करण्याची गरज नाही. या लेखामध्ये आपण अशा याची माहिती घेऊन याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पिकाची कापणी सहज करू शकतात.
गहू कापणी यंत्र
गव्हू काढणीसाठी रिपर कृषी यंत्रे आतापर्यंतचे सर्वात उत्तम मानली गेलेली आहेत. रिपर खूप हलका आहे. जर आपण या यंत्राच्या वजनाचा विचार केला तर एकूण वजन फक्त आठ ते दहा किलोपर्यंत आहे.
एका आकडेवारीचा विचार केला तर त्यानुसार ही कापणी यंत्रे चार पट अधिक कार्यक्षम असतात आणि गहू कापण्यासाठी त्यांना कमी मजूर लागतात.
इतकेच नाही तर तेलाचा वापर देखील खूप कमी आहे.रिपर यंत्र गहू, धान, ज्वारी कापण्यासाठी चांगले काम करते. त्यामुळेशेतकऱ्यांचा खर्च देखीलकमी होतो व नफा वाढतो. जर तुम्ही या कृषी यंत्राचे ब्लेड बदलले तर तुम्ही मका देखील सहज कापू शकतात.
बाजारात अनेक प्रकारची यंत्रे आहेत ज्यांची किंमत शेतकऱ्यांसाठी योग्य मानले जाते.
ही यंत्रे ऑनलाइन देखील उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत 15 ते 40 हजार पर्यंत असू शकते. तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यास तुम्ही अशी यंत्रे भाड्याने देखील घेऊ शकता.
गहू, बरसीम घास, हरभरा किंवा सोयाबीनच्या कापणी साठी देखील हे यंत्र वापरता येते.अगदी एक फुटापर्यंत ची झाडे देखील लहान कापणी यंत्र द्वारे सहजपणे कापली जातात.हे 50ccफोर स्ट्रोक इंजिन द्वारे समर्थीत आहे.
Share your comments