1. यांत्रिकीकरण

शेतकऱ्यांच्या दाराशी ट्रॅक्टर सारखे उभे दिसतील ड्रोन, ड्रोन खरेदीसाठी आता वैयक्तिक शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख अनुदान

शेतीमध्ये रोज नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीची कष्टाची कामे ही सहज व सुलभ होत आहेत. तसेच विविध प्रकारच्या यंत्रांचा देखील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्याने कामाला लागणारा वेळ आणि पैसा यामध्ये फार मोठी बचत झाली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
5 lakh subsidy for drone purchasing to farmer

5 lakh subsidy for drone purchasing to farmer

 शेतीमध्ये रोज नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीची कष्टाची कामे ही सहज व सुलभ होत आहेत. तसेच विविध प्रकारच्या यंत्रांचा देखील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्याने कामाला लागणारा वेळ आणि पैसा यामध्ये फार मोठी बचत झाली आहे.

इतकेच नाही तर कमीत कमी खर्चा मध्ये अधिकचे उत्पन्न शेतकरी राजांच्या खिशात येऊ लागले आहे.या सगळ्या तंत्रज्ञानाच्या धामधुमीत सरकार देखील विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत.

आपल्याला माहित आहेच की,सध्या शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्याचे तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली असून केंद्र सरकारने ड्रोनच्या वापरा संबंधी विविध प्रकारची योजना आखल्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना ड्रोन वापरायला प्रोत्साहन मिळावे.यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सुद्धा ड्रोनच्या वापरावर भर देण्यात आला आहे.

ड्रोन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जाते.परंतु हे अनुदान आगोदरफक्त शेतकरी उत्पादक कंपन्या,कृषी संबंधित सरकारी संस्था तसेच कृषी विद्यापीठांना देण्यातनिघणार अशा प्रकारचा निर्णय होता.

नक्की वाचा:Ambition:माहीची आता ड्रोन क्षेत्रात उडी, ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेस मध्ये गुंतवणूक

परंतु वैयक्तिक शेतकऱ्याला अनुदान देण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तरतूद नव्हती. परंतु आता ही प्रमुख समस्या उठवण्यात आली असून आता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव शोमिता बिश्वास यांनी एक आदेश जारी करून या आदेशानुसारआता वैयक्तिक शेतकरी देखील ड्रोनच्या अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.

जर वैयक्तिक रित्या एखाद्या शेतकऱ्याला ड्रोन विकत घ्यायचा असेल तर असे शेतकरी केंद्रीय कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या माध्यमातून किसान ड्रोन विकत घेऊ शकतील.केंद्र सरकारच्या नियमानुसार

जर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जर ड्रोन विकत घेतला तर त्यांना 75 टक्केपर्यंत अनुदान हे दहा लाखांवर देण्यात येते तर कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विद्यापीठे व आयसीएआरचे केंद्रांना 100 टक्के अनुदान देण्याची तरतूद अगोदरच केली गेली आहे.  परंतु आता या नवीन आदेशानुसार वैयक्तिक रित्या शेतकऱ्यांना ड्रोन साठी अनुदान देण्यात येणार आहे.

नक्की वाचा:म्हातारपण करा आरामदायी, घ्या लाभ 'या' योजनेचा मिळवा दरमहा 5 हजार रुपये

नक्की वाचा:मुलींसाठी उपयुक्त योजना! या दीर्घकालीन योजनेत दररोज 416 रुपये जमा केल्यास मिळेल 65 लाख रुपयांचा निधी

English Summary: now by central goverment rule get 5 lakh subsidy to personnaly to farmer for drone purchasing Published on: 07 June 2022, 12:07 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters