1. कृषीपीडिया

1634 आणि 1636 या गव्हाच्या दोन जाती जास्त उष्णतेत देखील देतील बंपर उत्पादन, वाचा याविषयी सविस्तर माहिती

गहू हे भारतातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून मध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. बहुतांशी गहू लागवडच्या बाबतीत पंजाब,हरियाणा ही राज्ये अग्रस्थानी आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
1634 and 1636 is two wheat veriety give more production in high tempreture

1634 and 1636 is two wheat veriety give more production in high tempreture

गहू हे भारतातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून मध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. बहुतांशी गहू लागवडच्या बाबतीत पंजाब,हरियाणा ही राज्ये अग्रस्थानी आहेत.

गहू या पिकाची लागवड रब्बी हंगामात होत असल्याने त्यावेळी प्रचंड प्रमाणात उष्णता असल्यामुळे गव्हाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. यावर्षी आपल्याला माहिती आहे की  गव्हाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली आहे त्यामुळे किमतीमध्ये वाढ झाली.

त्यामुळे जास्त उष्णतेत  देखील चांगले उत्पादन देतील अशा गव्हाच्या जातींच्या  संशोधनावर कृषी शास्त्रज्ञ बऱ्याच दिवसांपासून काम करीत आहेत. उष्णतेपासून गव्हाच्या उत्पादनात घट आल्याच्या बऱ्याच चर्चा असतात.

परंतु आता अशा चर्चांना पूर्णविराम लागणार असून मध्यप्रदेश राज्यातील नर्मदा पुरम येथील गहू संशोधन केंद्राने गव्हाच्या दोन नवीन जाती विकसित केल्या असून, या जाती जास्त तापमानात देखीलचांगले उत्पादन देतील. या गव्हाच्या जातींची नावे आहेत 1634 आणि 1636 ही होय.

या दोन जातींची बियाणे पुढील रब्बी हंगामापासून म्हणजेच येणाऱ्या सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील. गव्हाच्या जुन्या जातींच्या तुलनेने वाढत्या तापमानात यांना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही.

जर आपण गव्हाच्या इतर जातींचा विचार केला तर जेव्हा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमानात वाढ होते, अशावेळी पिक वेळेआधीच पक्व होते व उत्पादनात 20 ते 25 टक्के घट येते.

नक्की वाचा:Durum Wheat: भारतातील हा गहू आहे जगात प्रसिद्ध, यापासून जगात बनतात पास्ता, नूडल्स आणि मॅक्रोनी

 या ठिकाणी झाले या नवीन वाणांचे संशोधन

 या नवीन प्रकारच्या गव्हाच्या बियाण्यावर इंदूर, जबल्पुर, सागर आणि नर्मदापुरं या ठिकाणी संशोधन करण्यात आले. या झालेल्या संशोधनात असे दिसून आले की उच्च तापमानाला नंतर गहू वेळेपूर्वीपक्व होत नाही. पारंपारिक जुन्या गव्हाच्या जातींचे सरासरी उत्पादन जे 65 क्विंटल प्रति हेक्‍टर असे येते, ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अचानक झालेल्या उच्च तापमान वाढीमुळे पाच ते दहा क्विंटलने कमी होते. परंतु गावांच्या नवीन जातीमध्ये उत्पादनात कुठल्याही प्रकारची घट येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे बियाणे खूपच फायद्याचे ठरणार आहेत. तापमान सामान्य स्थितीत राहिले तर हेक्‍टरी 70 क्विंटल गव्हाचे उत्पादन यापासून मिळणे शक्य आहे.

नक्की वाचा:तुळशीची व्यावसायिक शेती ठरेल शेतकऱ्यांसाठी टर्निंग पॉइंट, जाणून घ्या लागवड माहिती

काढणीचा कालावधी

 या दोन जातींपैकी 1634 हे गव्हाची जात कापणीसाठी एकशे दहा दिवसात तयार होते असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे तर गव्हाची 1636 ही जात 115 दिवसांत कापणीस तयार होते. तसेच खायला देखील चांगला असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. गव्हाच्या या नवीन बियाण्याचे उत्पादन जुन्या देण्यापेक्षा दहा टक्के जास्त असते.

नक्की वाचा:चक्रभुंगा व्यवस्थापनासाठी फक्त एव्हढ करा आणि चक्रीभुंग्या पासून सोयाबीन ला सुटका मिळवा

English Summary: 1634 and 1636 is two wheat veriety give more production in high tempreture Published on: 13 June 2022, 06:46 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters