या योजनेतून मिळेल ट्रॅक्टर खरेदी साठी पाच लाख रुपयांचे अनुदान

23 November 2020 07:48 PM By: KJ Maharashtra

जर केंद्र सरकारचा विचार केला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या साठी केंद्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या मदतीने विविध राज्य सरकारे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण ही होय. योजना केंद्र पुरस्कृत आहे तसेच योजना राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची अवजारे जसे पावर विडर, कल्टीवेटर, पलटी नांगर, शुगर केन फ्रेश कटर, मिनी राईस मिल, मिनी डाळ मिल इत्यादी विविध प्रकारची अवजारे अनुदान तत्वावर दिली जातात.

या योजनेतून ट्रॅक्टर साठी रुपये दोन लाखांपासून ते पाच लाखापर्यंत अनुदान देय आहे. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या इतर अवजारांना देखील बारा हजार रुपयांपासून ते तीन लाखांपर्यंतच्या अनुदान दिले जाते. यामध्ये राज्य सरकार देखील आपल्या वाट्याला येत असून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्व प्रकारच्या अर्थ सहाय्य करीत आहेत. राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा आकांक्षी जिल्हे म्हणून समावेश केला असून इथल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे आहे. प्रत्येक अवजारांसाठी अनुदानाची योजना वेगवेगळे असल्याकारणाने त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी krushi -vibhag या लिंक वर जाऊन माहिती द्या.

लागणारी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेसाठी सातबारा उतारा, 8 अ उतारा, आधार लिंक असलेले बँक पासबुक, आधार कार्ड, विकत घेतात असलेल्या यंत्र अवजारांचा मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लाभार्थींसाठी जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता या योजनेसाठी असते.

हेही वाचा :सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदी करा ‘हे’ स्वस्त ट्रॅक्टर्स

या योजनेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. इतर कुठल्याही पद्धतीने भरलेले अर्ज ग्राह्य धरले जात नाहीत. आपले सरकार डीबीटी मुखपृष्ठ पाण्यासाठी आपले सरकार डीबीटी च्या https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. शेतकरी कुठूनही आपले सरकार डीबीटी पोर्टल वरून कृषी यांत्रिकीकरण योग्य साठी अर्ज करू शकतात. तसेच आपण केलेल्या अर्जाची स्टेटस जाणून घेण्यासाठी यूजर आयडी वापरुन कधीही त्याबद्दलची माहिती पाहू शकतात.

tractor loan Bank
English Summary: In this scheme government provide us 5 lakh loan for Tractor purchage

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.