1. इतर बातम्या

गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; भारतीय Tata Nexon कार आता CNG मध्ये उपलब्ध, जाणून घ्या किंमत

डिझेल आणि पेट्रोल इंधनाच्या किंमती गणनाला भिडल्या आहेत. यामुळे आता ग्राहकांचा कलही हळूहळू इतर पर्यायांकडे वळत आहे. ग्राहक आता डिझेल-पेट्रोल व्यतिरिक्त सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहेत.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; भारतीय Tata Nexon कार आता CNG मध्ये उपलब्ध

गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; भारतीय Tata Nexon कार आता CNG मध्ये उपलब्ध

पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या किंमती (Petrol diesel fuel prices) गणनाला भिडल्या आहेत. यामुळे आता ग्राहकांचा कलही हळूहळू इतर पर्यायांकडे वळत आहे. ग्राहक आता डिझेल-पेट्रोल व्यतिरिक्त सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार (CNG electric car) खरेदी करत आहेत. भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार मध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. आता गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सने प्रदीर्घ काळानंतर सीएनजी सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे.

भारतातील टाटा मोटर्स (Tata Motors) ही कंपनी कार क्षेत्रात आघाडीवर आहे. टाटा मोटर्सनेही सीएनजी सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह टियागो (Tata Tiago) आणि टिगॉर (Tata Tigor) या दोन गाड्या लॉन्च केल्या आहेत. टाटा मोटर्स कंपनी आता टियागो आणि टिगॉर नंतर CNG किटसह आपली सर्वात लोकप्रिय SUV Tata Nexon लाँच करण्याच्या तयारीत आहे.

टाटा नेक्सॉन सीएनजीची चाचणी देखील सुरू झाली आहे. ही सीएनजी इंजिन असलेली नेक्सॉन अनेक वेळा पाहायला मिळाली आहे. लवकरच कार लाँचची तारीख जाहीर केली जाणार आहे. टाटा मोटर्सने सीएनजी गाड्यांमध्ये विशेष फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध सीएनजी गाड्यांवर वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

भन्नाट आँफर : तिसरे बाळ जन्माला घाला आणि मिळवा ११ लाख रुपये
Aadhar Card: आधार कार्ड हरवले तर काळजी करू नका; ते असे मिळवा परत...

कार ची किंमत किती?

Tiago CNG ची एक्स-शोरुम किंमत 6.09 लाखांपासून 7.52 लाखांच्या दरम्यान आहे. तर Tigor CNG ची एक्स-शोरुम किंमतीला 7.69 लाख रुपयांपासून सुरुवात होते. कंपनीने Tiago CNG चार स्ट्रिम्स आणि Tigor CNG दोन स्ट्रिम्स मध्ये बाजारात आणल्या आहेत.

LPG सिलिंडर ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता अपघात झाल्यास मिळणार बंपर फायदा...
शेतकऱ्याचा नादच खुळा..! बनवला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

English Summary: Good news for car buyers; Indian Tata Nexon car now available in CNG, find out the price Published on: 03 February 2022, 10:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters