'ही' मशीन दोन तासात बाजूला करणार शेतातील दगड -गोटे

05 May 2020 12:38 PM


शेतीच्या कामासाठी यंत्रांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यंत्रांच्या साहाय्याने शेतीची मशागत करणे सोपे जाते. डोंगराळ आणि कठिण जमिनीवरही शेती करण्यास आपल्याला सोपे होत असते. डोंगरळ भागात किंवा जेथे खडकाळ प्रदेश आहे, अशा ठिकाणी शेतीची मशागत करणे फार अवघड असते. कारण शेत तयार करताना  मोठे कष्ट घ्यावे लागतात. यामुळे येथील शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेता आम्ही तुम्हाला एका मशीनची माहिती देत आहोत. या मशीनच्या साहाय्याने तुम्ही तेथील दगड- गोटे बाजूला करु शकणार आहात.

डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी आहे उपयुक्त(Farming Equipment for Hill Region Farmers)

शेती हा व्यवसाय पावसावर अवलंबून असतो, पण पेरणीच्या आधी आपल्याला शेती जमिनीची मशागत करावी लागते. त्यात आपली जमीन ही खडकाळ आणि डोंगराळ भागात असली तर मोठी मेहनत घ्यावी लागते. बऱ्याच शेतात खडे, छोटे दगड असल्याने तेथील पीकांची रोपे उमलण्यावर परिणाम होत असतो. यासाठी अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक मशीन विकसित करण्यात आले आहे. याच्या मदतीने आपण आपली शेतजमीन चांगली साफ करु शकता. या यंत्राचे नाव आहे स्टोन पिकर.

स्टोन पिकर मशीन (Stone picker machine)

स्टोन पिकर मशीन – डोंगराळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे कृषी यंत्र खुप उपयोगी आहे. स्टोन पिकरमुळे शेतातील अनेक कामे सोपी होतात. या यंत्राच्या साहाय्याने आपण शेतातील छोटे-मोठे दगड आणि खडे बाहेर काढू शकतो. विशेष म्हणजे याची किंमत आपल्याला परडवणारी आहे.  या यंत्राला मशीनला चालविण्यासाठी एका ट्रॅक्टरची गरज लागते. कोणत्याही प्रकारच्या ट्रॅक्टरवरहे मशीन चालू शकते. एका एकरातील खडे, दगड, केवळ दोन तासात बाजूला करण्याची क्षमता या यंत्रात आहे.

Farming Equipment for Hill Region Farmers Stone picker machine Stone picker Farming Equipment डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त स्टोन पिकर मशीन स्टोन पिकर स्टोन पिकर मशीन
English Summary: This machine remove the stone from field in two hours

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.