1. पशुधन

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील संधी

भारतात शोभिवंत मासे पालनाची व संवर्धनाची सुरुवात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली. शोभिवंत मासे पालन व संवर्धन याकडे आता स्वयंरोजगाराचे साधन म्हणून पहिले जाते. स्थानिक जागी उपलब्ध असणाऱ्या शोभिवंत माशांचे संवर्धन, निर्यात तसेच मत्स्यालयासाठी लागणारी विविध उपकरणे पुरवणे यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच हॉटेल, वॉटर पार्क, उद्याने व इतर सार्वजनिक जागी असणारी मत्स्यालय याच्या देखभालीची सेवा पुरवून ज्यादा आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. ह्या व्यवसायाचा महत्वाचा फायदा म्हणजे हा व्यवसाय कमीत कमी भांडवला पासून सुरु करू शकतो. स्त्रिया, बेरोजगार युवक व लहान मुले सुद्धा हा व्यवसाय सहजपणे करू शकतात.

KJ Staff
KJ Staff


भारतात शोभिवंत मासे पालनाची व संवर्धनाची सुरुवात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली. शोभिवंत मासे पालन व संवर्धन याकडे आता स्वयंरोजगाराचे साधन म्हणून पहिले जाते. स्थानिक जागी उपलब्ध असणाऱ्या शोभिवंत माशांचे संवर्धन, निर्यात तसेच मत्स्यालयासाठी लागणारी विविध उपकरणे पुरवणे यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच हॉटेल, वॉटर पार्क, उद्याने व इतर सार्वजनिक जागी असणारी मत्स्यालय याच्या देखभालीची सेवा पुरवून ज्यादा आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. ह्या व्यवसायाचा महत्वाचा फायदा म्हणजे हा व्यवसाय कमीत कमी भांडवला पासून सुरु करू शकतो. स्त्रिया, बेरोजगार युवक व लहान मुले सुद्धा हा व्यवसाय सहजपणे करू शकतात.

जागतिक बाजारपेठ:
जागतिक व्यापारात आशियाई देशाचा वाटा 68% एवढा आहे .तसेच या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या माशांत 90% हे गोड्या पाण्यातील तर 10% खाऱ्या पाण्यातील आहेत. संदर्भ (केंद्रीय मत्स्य शिक्षा संस्थान)

भारतीय बाजारपेठ:   
या व्यवसायासाठी 10 कोटी रुपयांची भारतीय बाजारपेठ उपलब्ध असून या बाजारपेठेचा वृद्धिदर प्रतिवर्षी 20% एवढा प्रचंड आहे. तसेच सध्याचा पुरवठा हा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारतातील माशांच्या जवळ-जवळ 200 जाती या व्यवसायासाठी उपयुक्त आहे.

मत्स्यालय तयार करणे

  • मत्स्यालय तयार करण्यासाठी लागणारे साहित्य : योग्य जाडीचे काचेचे तुकडे (टँकच्या साईज प्रमाणे) पॉलिथिनचा पेपर, चिकटपट्ट्या, धारदार चाकू, मोजपट्टी, काबोरेंडम दगड, हिरकणी (काच कापण्याची पट्टी), सिलिकॉन ट्यूब.

  • मत्स्यालय कसे तयार करावे :
    प्रथम काचेच्या योग्य तावदानाची निवड करून ती हिरकणीच्या साह्याने हव्या त्या आकारात कापून घ्यावीत .प्रथम सपाट पुष्ठभागावर पॉलिथिनचा पेपर अंथरून त्यावर मत्स्यालयाच्या तळासाठी निवडलेली काच ठेवावी त्यानंतर काचेच्या पाठीमागच्या कडेवर सिलिकॉनचा पातळ थर घ्यावा. पाठीमागे येणारी काच ह्यानंतर उभी करावीत आणि योग्य त्या रीतीने बाजूच्या काच जोडून घ्यावेत .ह्यानंतर प्रथम एका बाजूची काच उभी करा व पाठीमागच्या काचेच्या सिलिकॉन  लावलेल्या कडांना जोडावीत. दुसऱ्या बाजूची काच पण अश्या प्रकारे जोडा की शेवटी मत्स्यालयाच्या समोर येणारी काच सिलीकॉनच्या साह्याने दोन बाजूच्या काचा व तळाची काच ह्यांना जोडावी. मत्स्यालयाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कोपऱ्यांना चिकटपट्ट्या लावाव्यात, त्याच्यामुळे मत्स्यालयाला सिलिकॉन ओला असताना आधार मिळतो त्याचप्रमाणे सर्व जोडांना लावलेले सिलिकॉन बोटाने दाबून एक सारखे करावे. अश्याप्रकारे मत्स्यालय तयार झाल्यानंतर सिलिकॉन सुकण्याकरिता एक दिवस ठेवावे. जास्त झालेले सिलिकॉन चाकूने खरडून काढावे व त्यानंतर मत्स्यपेटीत पाणी ओतून कुठे गळती आहे का ते तपासून पहावे. तयार झालेले मत्स्यालय लाकडाच्या अथवा स्टीलच्या टेबलावर ठेवावी. हा टेबल मत्स्यपेटी, त्यातील पाणी व शोभेचे साहित्य या सर्वांचे ओझे पेलण्याइतपत भक्कम असावा. 

संबंधित लेख वाचण्यासाठी: शेततळ्यामध्ये मत्स्य सवंर्धन : शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे स्त्रोत

  • मत्स्यालयासाठी वेगवेगळे आकार : गोलाकार, षटकोनाकृती, त्रिकोणी मत्स्यालय, काचेची हंडी, आयताकृती मत्स्यालय, स्टीलचा सांगाडा असलेले मत्स्यालय, लाकडाचा सांगाडा असलेले, एका खिडकीचे मत्स्यालय.

  • मत्स्यालयाच्या सजावटीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य : थरांचे दगड, उभे पट्टे असलेले दगड, शिंपले, प्रवाळाची वाळू, ओढ्यात सापडलेले गोटे, मोठे गोटे, संगमरवराचे तुकडे, वाटाण्याच्या आकाराची वाळू.

  • मत्स्यालयाच्या देखभालीसाठी लागणारे साहित्य : माशांना व झाडांना प्रकाशासाठी बल्ब व ट्युबस, मासे पकडण्यासाठी व इतरत्र हलवण्यासाठी स्कुप जाळे, मत्स्यालयाच्या आतील भागावर जमा झालेली घाण व शेवाळ काढण्यासाठी ब्रश, पानझाडांची मत्स्यालयातील व्यवस्थित लावण करण्यासाठी चिमटे.

  • साफसफाई : सजावटीसाठी वापरण्यात येणारे सर्वप्रकारचे साहित्य त्याची मत्स्यपेटीतील रचना करण्यापूर्वी पाण्याचे स्वछ धुऊन घ्यावे. अन्यथा त्याच्यावर असणाऱ्या जीवजंतूंमुळे रंगीत माशांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

 


मत्स्यालयाची
मांडणी कशी करावी :

मत्स्यालयात वाळू ओतण्यापूर्वी वाळू खाली वापरण्यात येणाऱ्या फिल्टरचे भाग जोडून तो फिल्टर मत्स्यपेटीच्या तळावर ठेवावा. मध्यम आकाराच्या दगडाचा वापर जर सजावटीसाठी करावयाच्या असेल तर असे दगड स्वछ धुऊन फिल्टरवर ठेवावेत. त्यानंतर स्वच्छ धुतलेली वाळू फिल्टरवर तो पूर्ण झाकला जाईल अश्या रीतीने अंथरावी. वाळूचा उतार मत्स्यालयाच्या दर्शनी भागाकडे असावा. मत्स्यालयात झाडांची व्यवस्थित लावण करावी. झाडे लावताना ती परत उपटून पाण्यावर तरंगणार नाहीत तसेच ती दगडाखाली चिरडणार नाहीत याची काळजी घ्यावी. सजावटीसाठी लाकडाच्या तुकड्याच्या वापर करावयाचा असल्यास त्याची व्यवस्थित मांडणी करावी जेणे करून माशांना तेथे लपण्याकरिता जागा मिळेल. सर्व सजावटीची मांडणी झाल्यानंतर त्याच्यावर प्लास्टिकचा पेपर अंथरून त्या पेपरावर पाणी ओतावे. ह्यामुळे सजावटीला धक्का पोहचणार नाही सजावटीवर थेट पाणी ओतू नये.

संबंधित लेख वाचण्यासाठी: मत्स्य व्यवसायामधील स्वयंरोजगाराच्या विविध संधी

मत्स्यपेटित मासे कसे सोडावेत : 

ज्या पिशवीमधून मासे आणले असतील ती न उघडता मत्स्यपेटित ठेवावी. ह्यामुळे पिशवी मधील पाणी व मत्स्यपेटील पाण्याचे तापमान हळू हळू एक होईल. प्लॅस्टिकच्या पिशवीला छिद्र पाडावीत व बागेतील पाणी मत्स्यपेटील पाण्यात हळू हळू मिसळून घ्यावे शेवटी पिशवी पूर्णपणे उघडून माशांना मत्स्यपेटीत सोडावे.

मत्स्यालय घरात कुठे ठेवता येईल :

दोन मत्स्यपेट्या काटकोनात जोडता येतील. ह्यामुळे खोलीच्या सौदर्यात भर पडेल. ह्या दोन मत्स्यपेट्यात वेगवेगळी सजावट करता येईल व एकत्र न राहणारे मासे दोन भिन्न मत्स्यालयात ठेवता येतील. खोली जर मोठया आकाराची असेल तर पुरेश्या लांबीच्या मत्स्यपेटीच्या वापर करून तिची दोन भागात विभागणी करता येईल.

मत्स्यालयासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या जलीय वनस्पती :

  • टँँक फिलर्स लुडवीजिया, इलोडिया, व्हल्सनेरियाकॅबोम्बा.

मत्स्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यायोग्य झाडे:

  • किप्टोकोरिन : स्वस्त दरात उपलब्धवाढ हळू होते, मंद प्रकाशात पण वाढ होऊ शकते.
  • मत्स्यालयाच्या मध्यमभागी लावण्यायोग्य वनस्पती : इचिनोडोरस (अमेझॉन सोर्ड), अपोनोगेटाऊन. 

तरंगणाऱ्या वनस्पती ह्या वनस्पती खास करून प्रजननासाठी वापरल्या जाणाऱ्या मत्स्यालयात वापरतात.

मत्स्यालयासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे रंगीत मासे :

  • पिल्लांंना जन्म देणारे : गप्पी, सोर्ड टेल, प्लेटी, ब्लॅक मॉली.
  • अंडी घालणारी मासे : लाल शेपटीचा काळा शार्क, निऑन टेट्रा, गोल्डफिश, फायटर मासा, डिस्कस, एन्जल.

मत्स्यालयातील माशांसाठी खाद्य: कृत्रिम रित्या तयार केलेले खाद्य, निर्जंतुक करून वाळविलेले व नंतर गोढवून ठेवलेले, टूबीफेक्स किडे, वाळविलेल्या डासांच्या आळ्या, जिवंत टूबीफेक्स किडे, ब्लड वर्म, ग्रीडल वर्म, सुक्षम निमॅटोडस, डापनीया, मोईना इत्यादी.

माश्यांंना दिवसातून दोन वेळा खाद्य देण्यात यावे.

मत्स्यालयात घ्यावयाची काळजी वातावरण निरोगी राखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे:

  1. मत्स्यालयाच्या काचेची सफाई-सुके कागद, कापड यांच्या साह्याने काचेची वेळोवेळी सफाई करावी.
  2. मत्स्यालयातील पाण्याची प्रत चांगली राहावी म्हणून वेळोवेळी पाणी बदलावे.
  3. टाकीच्या तळाशी जमा झालेली घाण नळीच्या साह्याने काढून टाकावी आणि त्याच तापमानाचे पाणी भरावे.
  4. जास्त वाढलेल्या वनस्पतीची वेळोवेळी छाटछटाई करावी.

२ x १.५ x १.५ आकाराची मत्स्यपेटी तयार करण्यासाठी येणारा अंदाजित खर्च : 

अ.क्र

लागणारे साहित्य

अपेक्षीत खर्च

1

काच

550 रु.

2

सिलिकॉन ग्लू

160 रु.

3

अएराटॉर

150 रु.

4

रंगीत दगड

100 रु.

5

कृत्रिम झाडे

50 रु.

6

लाटिंग

80 रु

7

पोस्टर

90 रु.

8

खेळणे

200 रु.

9

गोल्ड फिश (जोडी)

80 रु.

10

मौली फिश (जोडी)

40 रु.

11

खाद्य

100 रु.

12

फिल्टर

550 रु.

 

एकूण

2,150 रु.


एक मत्स्य पेटी तयार करण्यासाठी येणारा खर्च: 2,150 रु.
विक्री: 4,000 रु.
नफा:1,850 रु. 

प्रा. जयंता सुभाष टिपले व प्रणय दत्तात्रय भदाडे
मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर, लातूर - ४१३ ५१७.
८७९३४७२९९४

English Summary: opportunity in ornamental fish rearing business Published on: 06 September 2018, 03:40 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters