शेततळ्यामध्ये मत्स्य सवंर्धन : शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे स्त्रोत

11 July 2018 12:47 PM

भारत हा कृषिप्रधान देश आहे. तथापि, ‘मर्यादित सिंचन हे या क्षेत्रातील महत्वाच्या आणि गंभीर अडचणींपैकी एक आहे, कारण भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रांपैकी केवळ ३५% संपूर्ण सिंचन क्षेत्र आहे. शेतीची दुःस्थिती बदलणं हे कठीण असलं तरी अशक्य नाही, हे जगातील काही देशांनी दाखवून दिलं आहे. म्हणून सिंचन समस्येवर मात करण्यासाठी तसेच कृषी उत्पादनास चालना देण्यासाठी शासनाने शेततळे बांधण्यास प्रोत्साहन दिले आहे जे पावसाच्या पाण्याची साठवण करून आणि त्यानंतर दुष्काळा दरम्यान या पाण्याचा शेतीसाठी वापर करू शकतात. शेतकर्‍यांच्या जमीनीमध्ये विविध कृषी योजना जसे की ‘राष्ट्रीय फलोत्पादन अभियान’, ‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना’, ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना’, मागेल त्याला शेततळे आणि जलयुक्त शिवार सारख्या योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये पाणी पातळीवर कोणताही प्रभाव न पाडता मत्स्यव्यवसायचा वापर करणे शक्य आहे. अलीकडच्या काळात शेततळ्यातील मत्स्यशेती हा चांगला जोडधंदा विकसित होत आहे. शेततळ्यामध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) इ. माशांचे संवर्धन करता येते. शेततळ्यावर आधारित मत्स्यशेती हे नक्कीच अतिरिक्त उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा आणि शेतकर्‍यांच्या शाश्वत उपजीविकेसाठी खात्रीशिर संभाव्य पर्याय आहे.

ह्या मत्स्य सवंर्धन मॉडेल मध्ये मत्स्य बोटूकली (Fingerling) चे उत्पादन करून नीलक्रांती योजने अंतर्गत राबविल्या जाणार्‍या “Mission Fingerling Program” ला 'बॅकवर्ड लिंकेज' देता येईल. अशी अपेक्षा आहे की हे मत्स्य सवंर्धन मोडेल या अतिरिक्त पाणी क्षेत्रात ब्लू क्रांती साध्य करण्यासाठी 'मिशन फिंगरिंग' कार्यक्रमांना एक वरदान सिद्ध होईल.

लघुधारक मासे उत्पादन प्रणाली

सगळेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करू शकत नाहीत आणि मच्छीमार लोक तो व्यवसाय परंपरेने करत आलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शेतकर्‍यांना हा व्यवसाय करणे शक्य नाही. असे असले तरी शेततळ्याच्या रुपाने मत्स्य व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध लघुधारक शेतकर्‍यांना झाली आहे. त्याचवेळी पाण्याची कमतरता, पारिश्रमिक मोबदला आणि  कमी लागत खर्च इत्यादि, शेतकऱ्यांना भेडसावणार्‍या मोठ्या समस्या आहेत. मत्स्य सवंर्धन मॉडेल हा एक शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा पर्यायी व्यवसाय म्हणून करण्यास भरपूर वाव आहे.

शेततळ्यातील मत्स्य नर्सरी सह संवर्धन

शेततळी बांधण्याचा उद्देश लक्षात लक्षात घेता, मत्स्य नर्सरी सह संवर्धन हा शेततळ्यावर आधारित मत्स्यपालनाचा सर्वात सोपा घटक आणि सर्वसाधारण शेतकर्‍यांना मत्स्यपालन क्षेत्रात योग्य प्रवेश-बिंदू आहे. पावसाळ्यात मत्स्यबीज केंद्रातून मत्स्यजिरे (४-५ मि.मी. आकाराचे) आणून २ ते ३ महीने संगोपन केल्यास बोटुकली आकाराचे (८० ते १५०  मिमी आकाराचे) मत्स्यबीज तयार होते. शेततळ्यामध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) इ. माशांचे संवर्धन करता येते. या जाती एकमेकाला त्रासदायक नाहीत.  त्यामुळे या जातींची मत्स्यबीज एकाच पाणीसाठ्यात वाढवू शकतो. याद्वारे शेतकऱ्याला किमान ३०  ते ४०  हजार रुपये उत्पन्न सहज मिळू शकते. जगवणुकीचे प्रमाण वाढवल्यास आणि काही काळ अधिक संवर्धन केल्यास उत्पन्नात त्याप्रमाणे वाढ होऊ शकते. शेततळ्यातील मत्स्य नर्सरी सह संवर्धन मधील विविध व्यवस्थापन धोरण खालील प्रमाणे आहेत:

शेततळयावर आधारित मत्स्यसंवर्धन मोडेल मध्ये खत (जैविक आणि अजैविक खत) उपयोजन करून प्राथमिक उत्पादकता वाढविणे हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नैसर्गिक अन्न म्हणून प्लवकची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल. याव्यतिरिक्त नैसर्गिक खाद्याच्या जोडीला पूरक खाद्य देणे एक महत्वाची भूमिका बजावते आणि ते ५ ते ८ % शरीराचे वजना प्रमाणे दिले जाते. थोडक्यात, शेततळ्यातील मत्स्य नर्सरी सह संवर्धन व्यवस्थापनात टप्‍पे पुढीलप्रमाणे आहेत.

  • संचयन पूर्वीचे व्यवस्थापन:                                                                                                                         पूर्व- संचयन व्यवस्थापनात पहिला टप्पा नांगरणे आहे (प्लास्टिक नसलेला), जलीय वनस्पती, भक्षक आणि इतर अनैच्छिक माशांचे उच्चाटन करणे. त्यानंतर त्यात शेण, पोल्ट्रीमधील विष्ठा यांसारखे जैविक खत किंवा इतर अजैविक खत किंवा दोन्ही एकामागून एक याप्रमाणे टाकले जाते. योग्य शैवाल उगविण्यासाठी दरहेक्टरी ५०० कि.ग्रा. शेंगदाण्याच्या तेलाची मळी, १००० कि.ग्रा. शेण आणि ५० कि.ग्रा. सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण खूप प्रभावशाली मानले जाते. या मिश्रणापैकी निम्मे मिश्रण पाण्यात व्यवस्थित मिसळून त्याची टूथपेस्टसारखी घट्ट पेस्ट केली जाते आणि साठवणीपूर्वी २ -३ दिवस संपूर्ण शेततळयामध्ये पसरवली जाते. पाण्यातील कीटक आणि त्यांचे लार्वा लहान वाढणार्‍या माशांबरोबर खाद्य मिळविण्यासाठी स्पर्धा करतात  म्हणून संचयनाच्या २-३ दिवसांपूर्वी तेल मिश्रण डोस (०.५ लिटर डिझेल आणि डिटर्जंट @ २०० ग्राम) वापरावे.

संचयन पूर्वीचे व्यवस्थापन

संचयन पूर्वीचे व्यवस्थापन

  • संचयन व्यवस्थापन :

मत्स्य जिरेंना (पिलांना) नव्या पर्यावरणाशी जुळवून घेता यावे म्‍हणून 'हापा' निश्चित करून आणि तिच्यामध्ये मत्स्य जिरे (६ मिमी) सोडवून निश्चित परिस्थितीनुसार हे सुलभतेने केले जाऊ शकते. ही प्रक्रिया साधारणत सायंकाळच्या वेळी करावे ज्यावेळी पाण्याचे तापमान कमी व पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण जास्त असते. शेततळ्यामध्ये मत्स्य जिरे घनता त्याच्या क्षेत्रा नुसार असावी.  

तक्ता . शेततळ्यातील संचयन घनता

तलाव आकार (मिटर )

क्षेत्र  (चौरस मिटर)

मत्स्यजिरे संचयन

१५ X १५

२२५

५००००

२० X २०

४००

१०००००

३० X ३०

९००

२०००००

 

  • खादय व्यवस्थापन :

संचयना नंतर लगेच मत्स्यजिरे नैसर्गिक अन्न अधाशीपणे खाण्यास प्रारंभ करतात. मासे वाढीसाठी केवळ नैसर्गिक आणि खत वापरामुळे वाढविलेली उत्पादकता यावरच अवलंबून न राहता, नैसर्गिक खाद्याच्या जोडीला पूरक खाद्य देणे अधिकतम मत्स्योत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते. मत्स्यबिजाला त्याच्या एकूण वजनानुसार खादय द्यावे. खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी भाताचा कोंडा व शेंगदाणा पेंड यांचे १: १ प्रमाणात मिश्रण करून ते रात्रभर भिजत ठेवावे आणि दुसर्‍या दिवशी त्याचे गोळे करून माशांना खादय म्हणून द्यावे. आजकाल, प्रथिणयुक्त तरंगते खाद्य (पिलेटेड) व्यावसायिकरित्या बाजारपेठेत उपलब्ध आहे, जे चांगल्या परिणामासाठी दिले जात आहे. दिलेल्या तक्त्यानुसार दैनंदिन  खाद्याची  मात्रा आणि वेळ ठरविण्यात यावी. पूरक खाद्य दररोज ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी द्यावे.

तक्ता . शेततळ्यातील  दैनिक पूरक आहार व्यवस्थापनांचे दर

कालखंड (संचयनच्या दिवसापासूनचे दिवस)

आहार दर

1 लाख मत्स्यजिर्‍यासाठी खाद्य ची मात्रा

१-५

एकूण प्रारंभिक वजनाच्या  २  पट

२८० ग्राम/दिवस

६-१५

एकूण प्रारंभिक वजनाच्या  ४-६  पट

५६०-८४० ग्राम/दिवस

१६-३०

एकूण प्रारंभिक वजनाच्या  ८ -१०  पट

११२०-१४०० ग्राम/दिवस

अशा प्रकारे सामान्य शेतकरी सुद्धा शेततळ्याच्या जोरावर उत्तम मत्स्य शेती करू शकतात.

शेततळ्यातील बोटूकली उत्पादनाचे अर्थशास्त्र (३० x ३० x ३ मिटर ):

योग्य संगोपनाच्या टप्प्यानंतर ऑक्सिजन पॅकिंगच्या माध्यमातून जिवंत बोटूकली विक्री करून कमीत कमी २८३५० रुपयांचा नफा ३० x ३० x ३ मिटर शेततळ्यात २ ते ३ महिन्यात सहज घेता येऊ शकतो.

तक्ता . तीन महिन्यांच्या काळात शेततळ्यातील बोटूकली उत्पादनाचे अर्थशास्त्र

अनू.क्रं

तपशील

युनिट

दर

(₹/युनिट)

प्रमाण

(युनिट)

रक्कम  (₹)

मत्स्य जिरे (कटला, रोहू,मृगळ)

लाख

१५००

२.०

३०००

शेण

किलो

०.५

१०००

५००

अजैविक खत (यूरिया & एसएसपी)

किलो

०.५

१०

५०

पूरक खाद्य

किलो

६०

३५

२१००

किरकोळ खर्च 

-

-

-

२०००

एकूण खर्च

७६५०

बोटूकली उत्पादन (Fingerling)

हजार

६००

६०

३६०००

निव्वळ नफा (-)

२८३५०/-

 

मुकेश भेंडारकर, मनोज ब्राम्हणे आणि नरेंद्र प्रताप सिंह                                                                                          भाकृअनुप- राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस प्रबंधन संस्थानमाळेगाव, बारामती- ४१३ ११५, पुणे                                mk.bhendarkar@icar.org.in

 

fishery blue revolution neelkranti राष्ट्रीय फलोत्पादन अभियान रोहू मृगळ कटला मत्स्यव्यवसाय नीलक्रांती मागेल त्याला शेततळे magel tyala shettale National Rural Employment Guarantee Scheme महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजना jalyukta shivar जलयुक्त शिवार National Horticulture Mission rohu katala mrugal
English Summary: Farmpond Fishery : Income Source of Farmer

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.