1. पशुधन

लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत, या वेळी होणार लसीकरणाला होणार सुरुवात,मोदींची घोषणा

शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे शिवाय आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून साऱ्या जगात ओळखला जातो. शेतीबरोबर जोडव्यवसाय म्हणून पशुपालन सुद्धा मोठ्या प्रमाणात केले जाते यामध्ये गाई म्हैस शेळ्या इत्यादी जनावरे पाळली जातात आणि त्यातून दुग्ध्यवसाय करून आपल्या उत्पादनाचा नवीन स्रोत बळीराजा करत आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
lumpy disease

lumpy disease

शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे शिवाय आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून साऱ्या जगात ओळखला जातो. शेतीबरोबर(farming) जोडव्यवसाय म्हणून पशुपालन सुद्धा मोठ्या प्रमाणात केले जाते यामध्ये गाई म्हैस शेळ्या इत्यादी जनावरे पाळली जातात आणि त्यातून दुग्ध्यवसाय करून आपल्या उत्पादनाचा नवीन स्रोत बळीराजा करत आहे.

शेतकरी वर्गावर दुहेरी संकट:-

दुग्ध व्यवसाय हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा आणि मुख्य जोडव्यवसाय आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गावर दुहेरी संकट ओढवले आहे त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी झाली आहे. एकीकडे पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान आणि दुसरीकडे जनावरांमध्ये वेगाने पसरत असलेला लम्पी सारखा आजार. या लम्पी आजारामुळे मोठ्या प्रमाणात जनावरे दगावत आहेत शिवाय याचा मोठा परिणाम हा दुग्धवयवसाय या वर सुद्धा झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतित आहे.

हेही वाचा:जनावरांमध्ये लम्पीरोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लोकांनी दूध प्यायच सोडून दिलं, वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लम्पी या आजाराचा धोका जनावरांमध्ये वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लम्पी या आजाराने हजारो जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचं मोठ नुकसान झाले आहे शिवाय या रोगाची शेतकरी बांधवांनी सुद्धा धास्ती घेतलेली आहे त्यामुळे लोकांनी दुधाचे सेवन करणे सोडून दिले आहे.

त्यामुळे या रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पातळीपासून ते केंद्र स्तरावर मोठे प्रयत्न सुरु आहेत. याच वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी दिली आहे, की भारतामधील काही शास्त्रज्ञांनी लम्पी या रोगावर लस तयार केली आहे. या लसीकरणाबरोबरच तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन हा आजार लवकरात लवकर अटोक्यात आणला जाईल अशी ग्वाही सुद्धा दिली आहे.

हेही वाचा:राज्यात लम्पी च्या प्रादुर्भावाने 22 जनावरांचा मृत्यू, नेमकी उपाययोजना काय?

2025 पर्यंत देशातील सर्वच जनावरांचे लसीकरण:-

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे त्याचबरोबर येथील दुग्धव्यवसाय हा मुख्य जोडधंदा आहे, परंतु गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये लम्पी सारख्या आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे असंख्य जनावरे दगावली आहेत शिवाय भारतातील अनेक राज्यात या आजाराने थैमान घातले आहे. सर्वात जास्त जनावरे ही राजस्थान मध्ये दगावली आहेत. तसेच दुधाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे.दूग्ध व्यवसाय शेतकऱ्यांचा मुख्य जोडव्यवसाय आहे . मात्र, गेल्या काही दिवसांपासून जनावरांना त्वचेचा आजार होत असून काही राज्यांमध्ये याची तीव्रता अधिक आहे. या वर गांभीर्याने विचार करता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येईल. शिवाय ही लस खूप फायदेशीर ठरणार आहे.

English Summary: Indigenous vaccine against lumpy disease developed, vaccination will be started at this time, Modi announced. Published on: 13 September 2022, 08:17 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters