1. कृषीपीडिया

Fertilizer Tips:ऊस शेतीसह सगळ्याच पिकांसाठी उपयुक्त आहे कोंबडी खत, रासायनिक खतांना ठरतोय उत्तम पर्याय

पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आणि जमिनीचे पोषण मूल्य टिकावे यासाठी शेतकरी रासायनिक खतांचाखूप भरमसाठ वापर करतात. याने पिकांचे उत्पादन तर काही प्रमाणात वाढते परंतु जमिनीवर आणि वातावरणावर खूप अनिष्ट परिणाम होत आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
poultry fertilizer is useful for cane crop and other type of crop and soil fertility

poultry fertilizer is useful for cane crop and other type of crop and soil fertility

 पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आणि जमिनीचे पोषण मूल्य टिकावे यासाठी शेतकरी रासायनिक खतांचाखूप भरमसाठ वापर करतात. याने पिकांचे उत्पादन तर काही प्रमाणात वाढते परंतु जमिनीवर आणि वातावरणावर खूप अनिष्ट परिणाम होत आहेत.

बरेच शेतकरीरासायनिक खतांच्या जोडीलाविविध प्रकारचे सेंद्रिय खत,शेणखत यांचा वापर करतात.परंतु यामध्येकोंबडी खत हा एक उत्तम पर्याय आहे. कोंबडी खताला उष्णता जास्त असल्यामुळे चांगल्या प्रमाणात शेतीसाठी एकच उपयुक्त असते व शेत जमिनीची उत्पादन क्षमता देखील वाढवते. रासायनिक खतांच्या बेसुमार वापराच्या पार्श्वभूमीवर बिघडत चाललेलेजमिनीचा दर्जा या पार्श्वभूमीवर कोंबडी खताचा विचार आणि शेतात वापर खूप महत्त्वाचा ठरू शकतो.

कारण कालानुरूप आता सेंद्रिय खत, कोंबडी खत,  एवढेच नाही तर पिकांची अवशेषयांचा वापर आणि महत्त्व आता पटू लागले आहे.कारण या खतांच्या वापरामुळेजमिनीचे भौतिक,रासायनिक आणि जैविक क्षमता सुधारण्यास मदत होते.जर आपण विकसित देशांचा विचार केला तरतिकडील शेतकरी याबाबत जागृत झाला असून सेंद्रिय खतांचा वापर वाढल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्‍क्‍यांपर्यंत बचत करणे त्यांना शक्‍य झाले आहे.

 कोंबडी खताचे एकंदरीत रासायनिक स्वरूप(Nutriants In Poultry Fertilizer)

 पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी त्यांच्या स्वतःच्या शेतात या खताचा वापर करतात. पोल्ट्री खतांमध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक मोठ्या प्रमाणात असतात शिवाय त्यात कॅल्शिअम हा महत्त्वाचा घटक देखील असतो.

कोंबडी खताचे सगळ्यात महत्त्वाच्या वैशिष्ट्य असल्यामुळे ते मुळातच सेंद्रिय असल्यामुळे त्याचे कंपोस्टिंग करण्याची गरज राहत नाही त्याचा थेट शेतात वापर करता येतो. जर आपण एक टन सुकवलेल्या केज पोल्ट्री खताच्या मूल्याचा विचार केला तर ते 100 किलो युरिया, 150 किलो सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश, 125 किलो कॅल्शिअम कार्बोनेट, 20 किलो गंधक, दहा किलो मॅग्नेशिअम सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट, एक किलो मॅग्नेशिअम सल्फेट, झिंक सल्फेट इत्यादी व अन्य अंशात्मक घटकाएवढे असते. इतकेच नाही तरइतर खतांच्या तुलनेत त्याची किंमत देखील खूप कमी असते त्यामुळे त्याचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे आहे.

 ऊस शेती साठी खूप उपयुक्त(Useful For Cane Crop)

 आपल्याला माहित आहेच की ऊस या पिकाला जास्त अन्नद्रव्याची गरज असते. त्यामुळे जास्त ऊस लागवड असलेल्या जमिनीची सुपीकता घटत चालल्याचे आपणाला माहिती आहे. ऊस पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संकल्पनाराबवणे खूप महत्त्वाचे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

या पिकासाठी शेणखत, प्रेसमड यांचा वापर महत्त्वाचा ठरतो. त्याशिवाय तागासारखे हिरवळीचे पीकआंतरपीक म्हणून घेतले तर लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी त्याचा वापर खत म्हणून करता येऊ शकते.ऊस शेतीसाठी कोंबडी खत वापरणे खूप गरजेचे आहे.

 कोंबडी खत केव्हा वापरावे?(Use Method Of Poultry Fertilizer)

 जमिनीच्या मशागत करताना पेरणी च्या अगोदर एक ते दीड महिना अगोदर कोंबडी खत जमिनीमध्ये मिसळावे व यानंतर कुळवाची पाळी द्यावी.  ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळून नये. जर तुम्हाला कोंबडी खत उभ्या पिकामध्ये द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडूनथंड करणे गरजेचे आहे.म्हणजे कोंबडी खतातील कर्बनत्र गुणोत्तर स्थिर राहतेव त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.दुसरे महत्त्वाचे म्हणजे उभ्या पिकात खते देताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. जर ओलावा नसेल तर पीक पिवळे पडण्याचा धोका संभवतो.

त्यामुळे ताजे कोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये. जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी पाच ते दहा टन खताचा वापर करावा.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या देशी तांदळाचं उत्पादन होणार डबल,ते सुद्धा कमी वेळेत शिवाजी विद्यापीठाचं महत्त्वपूर्ण संशोधन

नक्की वाचा:अमेरिकन संशोधकांनी केली कमाल! चंद्राच्या मातीवर प्रथमच उगवले रोपटे त्यामुळे होऊ शकतो का चंद्रावरील शेती करण्याचा मार्ग मोकळा?

नक्की वाचा:जिप्सम आहे एक ऑलराऊंडर घटक! पिकांच्या वाढीसाठी तर आहे खूप उपयोगी परंतु चोपण असलेल्या जमिनीची देखील करतो सुधारणा

English Summary: poultry fertilizer is useful for cane crop and other type of crop and soil fertility Published on: 14 May 2022, 11:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters