1. फलोत्पादन

जिप्सम आहे एक ऑलराऊंडर घटक! पिकांच्या वाढीसाठी तर आहे खूप उपयोगी परंतु चोपण असलेल्या जमिनीची देखील करतो सुधारणा

जिप्सम हा शेतीसाठी एक महत्त्वाचा घटक असून हे चांगले प्रकारचे भूसुधारक देखील आहे. कॅल्शियम सल्फेट यालाच जिप्सम असे म्हणतात. चोपण जमिनीची सुधारणा करायची असेल तर जीप्सम खूप उपयोग होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the calcium sulphate is so useful and benificial crop and soil fertility

the calcium sulphate is so useful and benificial crop and soil fertility

 जिप्सम हा शेतीसाठी एक महत्त्वाचा घटक असून हे चांगले प्रकारचे भूसुधारक देखील आहे. कॅल्शियम सल्फेट यालाच जिप्सम असे म्हणतात. चोपण जमिनीची सुधारणा करायची असेल तर जीप्सम खूप उपयोग होतो.

 ज्या जमिनीचा पीएच साडे सात पेक्षा जास्त झाला तर पिकांना अन्नद्रव्य अपटेक करताना बऱ्याच प्रकारच्या अडचणी उपलब्ध होतात. कारण त्या जमीन अल्काइन आहेत आणि जिप्सम मध्ये सल्फ्युरिक ॲसिड असल्याने जास्त झालेला पीएच कमी होतो व पिके जमिनीतील अन्नद्रव्य अपटेक करू शकतात.

 जिप्समचे होणारे फायदे (Benifit Of Calcium Sulphate)

1-जिप्सम मुळे जमिनीची सुपीकता वाढते.

2- जमीन भुसभुशीत होण्यासाठी मदत होतेतसेच जमिनीची रचना बदलणास देखील खूप मदत होते.

3- क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे  कण जिप्सम मुळे सुटसुटीत होतात. त्यामुळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.

4- बियाण्याची उगवणक्षमता चांगली होते.

5-पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.

6-जमिनीची धूप कमी होते.

7- जमिनीचा पाण्याचा निचरा होऊन जमिनी या पाणथळ होत नाहीत. तसेच जमिनीतील कॅल्शियम व मॅग्नेशियम चे प्रमाण सुधारते.

8- सेंद्रिय पदार्थांचे लवकरकुजण्यासाठी मदत होते.

9- जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो व तो पिकांना खूपच महत्त्वाचा आहे.

10-जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्य जास्त शोषले जातात.

11- कंद पिकांसाठी जिप्सम खूप महत्त्वाचा असून जिप्सम मुळे कंद पिकाला माती चिटकत नाहीआणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.

 

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Goat Rearing: शेळी पालन व्यवसाय करायचा आहे तर 'या' बँक देतील लोन, जाणून घ्या शेळीपालन लोन विषयी सविस्तर माहिती

नक्की वाचा:Top 5 Agri Bussiness Idea:हे 5 शेतीशी निगडित व्यवसाय शेती सोबत देतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग

नक्की वाचा:याला म्हणतात यश! शेतीत केला एक बदल अन आता वर्षाला कमवतोय 10 करोड; जाणुन घ्या हा भन्नाट प्रयोग

English Summary: the calcium sulphate is so useful and benificial crop and soil fertility Published on: 13 May 2022, 10:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters