1. बातम्या

आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या देशी तांदळाचं उत्पादन होणार डबल,ते सुद्धा कमी वेळेत शिवाजी विद्यापीठाचं महत्त्वपूर्ण संशोधन

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशातील 90 टक्के जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती येथील मुख्य व्यवसाय आहे. आपल्या कडे शेतामध्ये प्रामुख्याने दोन हंगाम असतात त्यामधील एक म्हणजे रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम. या दोन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात.

किरण भेकणे
किरण भेकणे
Kala Jirga

Kala Jirga

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशातील 90 टक्के जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती येथील मुख्य व्यवसाय आहे. आपल्या कडे शेतामध्ये प्रामुख्याने दोन हंगाम असतात त्यामधील एक म्हणजे रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम. या दोन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात.

शेतकरी वर्गाला होणार फायदा :

आपल्या देशात तांदळाच्या अनेक वाण उपस्थित आहेत त्यामधील खास बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील देशी वाण म्हणून  प्रसिद्ध  आणि  लोकप्रिय  असलेला आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या दोन्ही तांदळाच्या प्रजातीवर संशोधन करण्यात आलं आहे .कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने या  तांदळाच्या  दोन्ही  वाणाचे संशोधन केले. या दोन्ही तांदळाच्या वाणांचा वास, चव आणि पोषणमूल्ये कायम ठेवून त्याचे उत्पादन वाढवण्यात आले  आहे. तसेच यावर  संशोधन  करून  या  वाणांचा परिपक्‍व  होण्याचा कालावधी सुद्धा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा हा शेतकरी वर्गाला होणार आहे. कारण आता कमी वेळेमध्ये अधिक उत्पन्न मिळेल असे वक्तव्य शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एन. बी. गायकवाड यांनी केले आहे.

हेही वाचा:खरिप हंगामात करा या औषधी वनस्पतीची लागवड आणि मिळवा 7 पटीने फायदा


कोल्हापूर विद्यापीठाने या वाणावर प्रयोग करून वाणांच्या अनुवांशिक गुणांमध्ये सुधारणा घडवून आणून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या साठी या वानांवर म्युटेजेनिक एजंटचा वापर करून या पिकांच्या सहा पिढ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामधून अधिक उत्पादन देणारे, लवकर परिपक्‍व होणारे, कमी उंचीचे आणि आडवे न पडणारे असे गुणधर्म असणारे वाण विकसित केले.

48 देशी वाणांचे संकलन आणि संवर्धन:-

कोल्हापूर जिल्ह्यातून 9 सुवासिक आणि 39 असुवासिक अशा एकूण 48 भातांच्या देशी वाणांच्या प्रजाती गोळा करण्यात आल्या होत्या साल 2020 आणि 2021 या सलग दोन वर्षांच्या खरीप हंगामात त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील शेतकरी, महिला आणि पुरुषांच्या बचत गटांना या संकलित केलेल्या देशी वाणांचे संवर्धन करण्यासाठी वितरण केले आहे. यामुळे फायदा म्हणजे कमी वेळात उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि पिकाचा।काळ सुद्धा कमी करण्यात आला आहे.

English Summary: Ajra Ghansal and Kala Jirga will double the production of indigenous rice, which is also important research of Shivaji University in a short time. Published on: 13 May 2022, 04:34 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters