1. हवामान

Rainfall Alert: महाराष्ट्रात पावसाच्या कोसळधारा सुरूच! येत्या काही तासांत आणखी मुसळधार बरसणार; अलर्ट जारी

Rainfall Alert: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही भागातील शेतीला समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अजूनही येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या हालचाली दिसून येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

heavy rain maharashtra

heavy rain maharashtra

Rainfall Alert: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार मान्सूनचा (Monsoon) पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही भागातील शेतीला समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अजूनही येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या (Heavy Rain) हालचाली दिसून येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

IMD नुसार, 15 आणि 16 ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, कोकण आणि गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, या आठवड्यातही महाराष्ट्राच्या विविध भागात हलका ते जोरदार पाऊस पडेल. हवामान केंद्र मुंबई (Weather Center Mumbai) ने मंगळवारसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

एकच नंबर! खर्च कमी उत्पादन जास्त; मशागत न करताही घेता येणार पिके; जाणून घ्या...

रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय 16 ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामन खट्याने पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे.

पशुपालकांनो घाबरू नका! होमिओपॅथीमध्ये लंपी संसर्गावर चमत्कारिक उपाय, प्राणी होतायेत लगेच बरे

त्याचवेळी पुण्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) सुरू आहे. अमरावती, गोंदिया, 17 ऑगस्टला नागपूर आणि 18 ऑगस्टला गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतरही पावसाचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो एकाच शेतीत करा 4 प्रकारची शेती! कमवाल लाखो; जाणून घ्या...
अवघ्या 6 महिन्यात लखपती करणारी शेती! आयुर्वेदातही वाढत आहे मागणी

English Summary: Rainfall continues in Maharashtra! Published on: 16 August 2022, 09:24 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters