1. हवामान

IMD Alert: देशातील या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी

IMD Alert: देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. येत्या काही तासांमध्ये आणखी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

heavy rain

heavy rain

IMD Alert: देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) कहर सुरूच आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) धुमाकूळ घातला आहे. येत्या काही तासांमध्ये आणखी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

पुढील आज आणि उद्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच 15 आणि 16 ऑगस्ट रोजी गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्यानुसार, दिल्लीत आज पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. वास्तविक दक्षिण-पश्चिम मान्सून पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये सक्रिय आहे. त्याच वेळी, उत्तर-पश्चिम भारतात हवामान कोरडे राहील.

अरे व्वा, भारीच की! आता भात शेतीवर रोगाची भीती नाही, वापरा ही खास पद्धत; जाणून घ्या...

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या पावसाची नोंद झाली आहे. या एपिसोडमध्ये आजपासून पुढील तीन दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडू शकतो. ओडिशामध्ये आज मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.

येथील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनो शेतात करा वेगवेगळ्या पिकांची लागवड! उत्पन्नात होईल भरघोस वाढ; जाणून घ्या...

खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरच्या मते, आज ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाची शक्यता आहे. यासोबतच दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहारच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

गुजरात, कोकण आणि गोव्यातही आज पावसाची शक्यता आहे. नवीन हवामान प्रणाली तयार झाल्यामुळे ओडिशा, झारखंड आणि बंगालच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशामध्ये नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:
Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत कृषी जागरणनेही फडकवला तिरंगा
करोडपती बनवणारी शेती! या झाडांची एकदाच लागवड आणि बक्कळ कमाई; जाणून घ्या या शेतीबद्दल...

English Summary: IMD Alert: Heavy rain warning for these states of the country Published on: 14 August 2022, 09:22 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters