Rainfall Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. कधी उघडीप मिळत आहे तर कधी संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात खरीप हंगामातील (Kharip Season) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काही तासांत राज्यातील अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनने महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान केले. रत्नागिरी, अमरावती, पालघर हे जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. पावसामुळे जीवित व वित्तहानी होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील पिके भुईसपाट झाली.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने एकदा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Secure Future: केंद्र सरकारच्या योजनेतून मिळणार प्रति महिना ९ हजार रुपये; असा घ्या लाभ
त्याचवेळी पालघरसाठी १५ आणि १६ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात कमाल आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.
दुसरीकडे, मुंबई, रत्नागिरी, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
डिझायर, टिगोर किंवा ऑरा कोणती कार आहे भारतातील सर्वोत्तम सीएनजी कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता
गुरुवारी दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजधानीत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहील. शुक्रवार संध्याकाळपासून पावसाचा जोर कमी होईल, 17 ते 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस अपेक्षित नाही.
राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे
मध्य प्रदेशात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील २४ तासांत राजस्थानच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने बुधवार ते शनिवार, 14-17 सप्टेंबर या पुढील तीन दिवसांत उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Wheat Cultivation: गहू लागवडीचा विचार करताय तर या ३ जातींची लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न
Farming Business Ideas: शेळीपालन व्यवसायातून दरमहा कमवा २ लाख रुपये; कर्जावर मिळतेय 90% सबसिडी
Share your comments