1. हवामान

IMD Alert: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; या भागात यलो अलर्ट

IMD Alert: राज्यभरात काल पाऊस (Rain) पुन्हा एकदा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, राज्यात काल पुन्हा पावसाने चांगलीच हजेर लावली आहे. (Maharashtra Rain)

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
IMD Alert

IMD Alert

IMD Alert: राज्यभरात काल पाऊस (Rain) पुन्हा एकदा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, राज्यात काल पुन्हा पावसाने चांगलीच हजेर लावली आहे. (Maharashtra Rain)

जोरदार पावसानं हजेरी लावली

अकोला, पुणे, मुंबईसह उपनगरांमद्धे अनेक भागात रात्री उशिरा पाऊस झाला. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

खवय्यांसाठी आनंदाची बातमी: आता वर्षभर कोकणच्या 'हापूस'ची चव चाखता येणार

या भागात यलो अलर्ट

आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे.

त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात आणि परिसरात चांगला पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांनो रस्त्यावरच्या लढ्यासाठी सज्ज राहा: राजू शेट्टी यांचा एल्गार

सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस

सप्टेंबर महिन्यात देशात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (India Meteorological Department) वर्तवला आहे. त्यामुळं मान्सून यावर्षी देखील लवकर परतीचा प्रवास करणार नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा ( Mrutyunjay Mohapatra) यांनी दिली.

IMD Alert: परतीचा पाऊस राज्यात मुसळधार कोसळणार; सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

English Summary: IMD Alert: Rains again active across the state Published on: 04 September 2022, 09:41 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters