1. बातम्या

शेतकऱ्यांनो रस्त्यावरच्या लढ्यासाठी सज्ज राहा: राजू शेट्टी यांचा एल्गार

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी स्वाभिमानीचा बुलंद आवाज मा. खा. राजू शेट्टी यांनी नवा एल्गार केला आहे. उसाची एकरकमी एफआरपी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन मा. खा. राजू शेट्टी यांनी केले.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Raju Shetty

Raju Shetty

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी स्वाभिमानीचा बुलंद आवाज मा. खा. राजू शेट्टी यांनी नवा एल्गार केला आहे. उसाची एकरकमी एफआरपी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन मा. खा. राजू शेट्टी यांनी केले.

खा. राजू शेट्टी शाहूवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी सरुड येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेट्टी म्हणाले, इथेनॉल, कच्ची साखर तसेच उपपदार्थ निर्मितीतून साखर कारखान्यांना अधिकचे उत्पन्न मिळते.

तरीही ऊस उत्पादक शेतकरी हक्काच्या ऊसदरापासून अद्याप दूर राहत आल्याची खंत व्यक्त करीत व्यापक जनजागृतीतून सरकार आणि कारखानदार विरोधातील शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्याचे संकेतही यावेळी राजू शेट्टी यांनी दिले.

हेही वाचा: शिंदेचा ठाकरेंना मोठा धक्का; "राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत घेतला मोठा निर्णय"..

खा. शेट्टी म्हणाले, शेतकरी चळवळीत स्वाभिमानीची धार कमी झाल्याचा आभास निर्माण केला जात आहे. परंतु शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी स्वाभिमानीचा आवाज अद्यापही बुलंद आहे. साखर कारखानदारी अडचणीत असल्याचे भासवून ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखानदारांनी शेतकऱ्यांचा छळवाद सुरू केला आहे.

हेही वाचा: फडणवीस आणि चव्हाणांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण; चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, ही भेट...

शेतकऱ्यांचे उत्पन्न पूर्वीच्या तुलनेत तिथेच राहिले आहे. याउलट उसाच्या रसासह मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती तसेच कच्ची साखर उत्पादनातून कारखान्यांचा उत्पन्न स्रोत वाढला आहे.

कारखानदारांकडे याचा हिशोब मागण्याची गरज आहे. साखरेला बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याची संधी उपलब्ध आहे, मात्र सरकारचे चुकीचे धोरण अडथळा ठरत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार...
भाजपचे नेते येतील अन् बारामतीचा विकास पाहून जातील; जयंत पाटलांचा भाजपला खोचक टोला

English Summary: Farmers get ready for street fight: Raju Shetty's Elgar Published on: 03 September 2022, 10:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters